शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ठरला बालगुन्हेगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:30 IST

जलदगती कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, उच्च न्यायालयात होणार पुढील सुनावणी

ठळक मुद्देया प्रकरणात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आलेअ‍ॅड. अब्बास काझी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते

सोलापूर : अ‍ॅटोमोबाईल्समधील व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी सरफराज अ. करीम काझी याची उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूरच्या जलदगती न्यायालयात सुनावणी झाली. यात जलदगती न्यायालयाच्या न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांच्यापुढे सुनावणी होऊन त्यांनी सदर आरोपी बालगुन्हेगार असल्याचा निकाल दिला. यापुढील सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील आरोपी सरफराज काझी याने १५ जून २००९ रोजी चव्हाण अ‍ॅटोमोबाईल्समधील व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून केला म्हणून जेलरोड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. हा खटला २०११ साली त्यावेळच्या जलदगती न्यायाधीशांसमोर आला. न्यायालयाने सरफराज काझी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

या शिक्षेविरुद्ध अ‍ॅड. अब्बास काझी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. घटनेच्या वेळी म्हणजे १५ जून २००९ रोजी अर्जदार बालगुन्हेगार होता, असा मुद्दा मांडला. यावर उच्च न्यायालयाने घटनेच्या वेळी बालगुन्हेगार होता किंवा नाही ? हे ठरविण्यासाठी सोलापूरच्या जलदगती न्यायालयास आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे अर्जदाराच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 

आरोपी हा बालगुन्हेगार होता, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्यामुळे यामुळे अर्जदार आरोपी तुरुंगातून मोकळा होण्यास मदत होणार आहे. या प्रकरणात अर्जदार आरोपीतर्फे अ‍ॅड. अब्बास काझी, अ‍ॅड. महमदअली काझी यांनी तर सरकार पक्षाकडून अ‍ॅड. वामनराव कुलकर्णी यांनी काम पाहिले.

पाच साक्षीदार तपासलेया प्रकरणात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. अ‍ॅड. अब्बास काझी यांनी अर्जदाराने दाखल केलेल्या लेखी व तोंडी पुराव्यावरुन अर्जदार १५ जून २००९ रोजी बालगुन्हेगार होता, असा युक्तिवाद केला. या पुष्ठ्यर्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडेही दाखल केले. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. व्ही़ आर. कुलकर्णी यांनी या प्रकरणात नंतर खोटे पुरावे तयार केले आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून जलदगती न्यायालयाच्या न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी घटनेच्या दिवशी आरोपी हा बालगुन्हेगार होता, असा निकाल दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCrimeगुन्हा