बाळासाहेबांनी मुस्लिमांना सन्मानाची वागणूक दिली : मुलाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST2021-01-25T04:22:30+5:302021-01-25T04:22:30+5:30

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे, महेश चिवटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुलाणी बोलत ...

Balasaheb treated Muslims with respect: Mulani | बाळासाहेबांनी मुस्लिमांना सन्मानाची वागणूक दिली : मुलाणी

बाळासाहेबांनी मुस्लिमांना सन्मानाची वागणूक दिली : मुलाणी

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे, महेश चिवटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुलाणी बोलत होते. पुढे बोलताना इस्माईल मुलाणी म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजाची वेळ झाल्यानंतर तत्कालीन मंत्री साबिर भाई शेख यांना त्यांच्या स्वतःच्या मातोश्री बंगल्यात नमाज पठणासाठी जागा उपलब्ध करून दिली.

यावेळी करमाळा शहराचा किल्ला विभागात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आवताडे, महेश चिवटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, शहरप्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना उपशहरप्रमुख संजय भालेराव, पंकज परदेशी, मोहम्मद रफीक कुरेशी, उपशहरप्रमुख अविनाश भिसे, दादासाहेब तनपुरे, प्रसाद निंबाळकर, नानासाहेब आनारसे, विशाल भिंगारे, करण काळे, स्वप्निल मुळे, सागर कोकाटे, मयूर साबळे, रणजित जाधव, संतोष कांबळे, केशव साळुंखे, विनायक कांबळे, अभिजित सुरवसे, शुभम राऊत, आकाश राऊत, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो ओळी :

२३करमाळा-शिवसेना

शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक इस्माईल मुलांनी यांचा सत्कार करताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, विशाल गायकवाड दिसत आहेत.

Web Title: Balasaheb treated Muslims with respect: Mulani