दलित महासंघांच्या युवक आघाडी अध्यक्षपदी बगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST2021-03-17T04:22:36+5:302021-03-17T04:22:36+5:30
बार्शी : दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मचिंद्र सकटे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील शासकीय विश्रामगृहात दलित महासंघाच्या बार्शी ...

दलित महासंघांच्या युवक आघाडी अध्यक्षपदी बगाडे
बार्शी : दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मचिंद्र सकटे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील शासकीय विश्रामगृहात दलित महासंघाच्या बार्शी शहर व तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत नूतन बार्शी तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी पांगरीचे संतोष भास्कर बगाडे यांची निवड झाली.
ही बैठक तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत तालुका उपाध्यक्षपदी सुधाकर काळे, बार्शी शहर संघटकपदी सचिन क्षीरसागर तर समाज माध्यम संपर्कप्रमुख म्हणून देवा कानडे यांची निवड जाहीर केली.
बैठकीदरम्यान समाजातील शेवटच्या घटकाला शासन लाभ मिळवून देण्याकरिता लढा तीव्र करणार असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी दिली.
यावेळी बार्शी शहराध्यक्ष संदीप आलाट, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश खुडे ,हरिश्चंद्र कांबळे, कैलास आडसूळ, शहर उपाध्यक्ष उमेश मस्तूद, तालुका उपाध्यक्ष उमेश धावारे, शहर उपाध्यक्ष राम नवले उपस्थित होते.