शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आयुर्वेदिक डॉक्टरांना मिळतोय ‘एमबीबीएस’ पेक्षा निम्माच पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:58 IST

समकक्ष दर्जा; समान वेतन देण्याची निमा स्टुडंट फोरमची मागणी

ठळक मुद्देराज्य शासनाने १२ आॅगस्ट रोजी राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या वेतनात वाढराज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयीन पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना लागू करण्यात आला नाहीएमबीबीएस डॉक्टर न मिळाल्यास बीएएमएस, बीयुएमएस, बीडीएस उमेदवारांना संधी

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या २६ मे १९८१ च्या शासन निर्णयानुसार आयुर्वेद चिकित्सक (बीएएमएस) आणि अ‍ॅलोपॅथी (एमबीबीएस) चिकित्सक यांचा समकक्ष दर्जा आहे. हा नियम असताना बीएएमएस डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टरांपेक्षा अर्धेच वेतन मिळते. 

याला विरोध करुन राज्यात समान वेतन समान धोरण लागू करण्याची मागणी निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) स्टुडंट फोरमने केली आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीपासूनच बीएएमएस (आयुर्वेद), बीयुएमएस (युनानी) वैद्यकीय अधिकारी, आंतरवासीता प्रशिक्षणार्थी जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. कोविड विमा सुरक्षा कवच त्यांना नाकारण्यात आले, असे असताना एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या जाणाºया मानधनापेक्षा मोठी तफावत आहे.

कंत्राटी पद्धतीने ठिकठिकाणी भरल्या जाणाºया वैद्यकीय अधिकाºयांच्या नवीन जागांसाठी मानधनात विषमता आहे. शासन हे अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेद विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप संघटनेचे ऋषभ मंडलेचा, अक्षय गांधी, आमीर कोटनाळ यांनी केला. वैद्यकीय अधिकारी पद भरताना एमबीबीएसला प्राधान्य देण्यात येते. एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्यास बीएएमएस, बीयुएमएस, बीडीएस उमेदवारांना संधी दिली जाते. त्यातही त्यांना एमबीबीएसपेक्षा अर्धेच मानधन देण्यात येते असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तफावत सुमारे ३० हजारांची..राज्य शासनाने १२ आॅगस्ट रोजी राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या वेतनात वाढ केली. मात्र, हा निर्णय राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयीन पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना लागू करण्यात आला नाही. नव्या नियमानुसार अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचे मानधन हे ६४ हजार ५५१ रुपये वरुन ७१ हजार २४७ रुपये तर डेंटल विद्यार्थ्यांचे मानधन हे ४९ हजार ६४८ वरुन ५५ हजार २५८ करण्यात आले. तर आयुर्वेदिक डॉक्टरांचे मानधन हे पूर्वी ४० हजार होते आताही तितकेच आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरHealthआरोग्यjobनोकरी