आवाटी - कोर्टी रस्त्यावर चिखलातून वाहनधारकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:30+5:302021-09-09T04:27:30+5:30
करमाळा : तालुक्यातील आवाटी - कोर्टी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हा ...

आवाटी - कोर्टी रस्त्यावर चिखलातून वाहनधारकांची कसरत
करमाळा : तालुक्यातील आवाटी - कोर्टी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला असून, कसरत करत रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्यावर घसरुन अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. रस्त्याचे काम करणारे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
करमाळा- तालुक्यातील कोर्टी - आवाटी हा रस्ता सोलापूर, उस्मानाबाद, लातूरला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. करमाळ्यापासून पांडे, फिसरे, सालसे, वरकुटे, आवाटी येथील नागरिकांना दैनंदिन कामासाठी जा - ये करताना त्रास सहन करावा लागत आहे. वरकुटे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांना यावे लागते. प्रचंड त्रास सहन करत बिटरगाव (श्री), आळजापूर, कामोणे, बाळेवाडी, नीलज, बोरगाव ठिकाणावरुन लस घेण्यासाठी या रस्त्याने नागरिक येतात. ठेकेदाराकडून अतिशय संथ गतीने या रस्त्याचे काम सुरू आहे. बाजूने रस्ता काढून दिलेला आहे. मात्र, या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. अनेक वाहने घसरत आहेत. दुचाकीस्वाराला तर गाडीच चालवता येत नाही. ---
सालसे येथे काम सुरू असलेल्या पुलाजवळ पाणी साचत आहे. संबंधित ठेकेदाराचे कामगार अनेकदा फक्त रस्त्याची पाहणी करतात. मात्र, नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
- आण्णासाहेब रुपनवर
---
फोटो : ०७ करमाळा
आवाटी-कोर्टी रस्त्यावर चिखलातून
वाहनधारकांना कसरत करत रस्ता पार करावा लागत आहे.