कुंभारी, होटगी ग्रामपंचायतीसाठी सर्व प्रभागात सहाय्यकारी मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:40+5:302020-12-30T04:29:40+5:30
अधिक मतदार असतील तर अशा प्रभागात सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापित केले जाते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि कुंभारी या ...

कुंभारी, होटगी ग्रामपंचायतीसाठी सर्व प्रभागात सहाय्यकारी मतदान केंद्र
अधिक मतदार असतील तर अशा प्रभागात सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापित केले जाते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि कुंभारी या दोन लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागात ८००पेक्षा अधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे येथील प्रत्येक प्रभागांमध्ये दोन मतदान केंद्र असणार आहेत. तालुक्यात १७८ मूळ मतदान केंद्रे, तर ३६ सहाय्यकारी मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १८ झोनल अधिकारी आणि २४ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत.
२१४ मतदान केंद्रांतून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली. नव्याने स्थापित झालेल्या मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाच्या कक्षेतील ३१ तर अन्य २१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया एकत्रितपणे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयामार्फत राबवण्यात येणार आहे.
-------
एकूण ग्रामपंचायती - ५२
निवडले जाणारे सदस्य- ५०६
पुरुष सदस्य - २२७
स्री सदस्य -२७९
अनु. जाती - ७६
अनु. जमाती - २१
नामाप्र- १२६
सर्वसाधारण- २८३
------