सोलापूरजवळ जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; चार दुकाने फोडून पहाटे चोरी
By Appasaheb.patil | Updated: October 12, 2023 09:04 IST2023-10-12T09:03:53+5:302023-10-12T09:04:41+5:30
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे गुरुवारी भल्या पहाटे सोलापूर जिल्हा सहकारी बँकेसह चार दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली.

सोलापूरजवळ जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; चार दुकाने फोडून पहाटे चोरी
महेश कुलकर्णी
कुरुल : मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे गुरुवारी भल्या पहाटे सोलापूर जिल्हा सहकारी बँकेसह चार दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बँकेचा दरवाजा तोडून कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिजोरीला हात न लावल्याने सायरन वाजला नाही. अन्य दोन चोऱ्यात मोटारसायकल सह २० हजारांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे पहाटेच घटनास्थळी दाखल झाले होते. चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांची पथक काम करीत आहे. कामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे.