अकलूजमध्ये सीसी टीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By विलास जळकोटकर | Updated: May 21, 2023 09:55 IST2023-05-21T09:55:36+5:302023-05-21T09:55:53+5:30
अकलूज येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन आहे.

अकलूजमध्ये सीसी टीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न
सोलापूर : सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम मशीन मधील रोकड पळण्याचा प्रयत्न चोरट्याकडून झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीन ते पाचच्या या कालावधीमध्ये अकलूज येथे घडली.
पोलीस सूत्रानुसार अकलूज येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन आहे. शनिवारी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान चोरट्यांनी आपली चोरी लपवण्यासाठी सर्वप्रथम एटीएम मशीन परिसरातील शिशी टीव्ही वर काळ्या रंगाचा स्प्रे मारला, त्यानंतर लॉक तोडून आत प्रवेश केला आणि पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हा बेत फसला गेला त्यामुळे चोरट्याच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेमुळे एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. येथे सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी होऊ लागली आहे.
याप्रकरणी जनार्दन शंकर वय 56 राहणार कामाने नगर अकलूज यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास हवालदार कोळी हे करीत आहेत.