पेट्रोल टाकून दुकान पेटवून देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:35+5:302021-08-12T04:26:35+5:30
याप्रकरणी दुकानमालक राजकुमार सिद्रामप्पा बिराजदार (वय ४०, रा. मांजरगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मांजरगावमध्ये सोमवारी किराणा दुकान उघडले ...

पेट्रोल टाकून दुकान पेटवून देण्याचा प्रयत्न
याप्रकरणी दुकानमालक राजकुमार सिद्रामप्पा बिराजदार (वय ४०, रा. मांजरगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मांजरगावमध्ये सोमवारी किराणा दुकान उघडले होते. दुपारी पावणेचारच्या सुमारास चव्हाण दुकानासमोर आला. तुझे दुकान बंद कर, शटर खाली घे, असे म्हणून शिवीगाळी करू लागला. त्यावेळी दुकान बंद करण्यासाठी का सांगत आहे? अशी विचारणा करीत असताना, त्याने बाटलीमधील पेट्रोल दुकानाच्या लाकडी काउंटरवर ओतून पेटलेली काडी टाकून दुकानाचे लाकडी काउंटर पेटवून दिले. धावपळ करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये किराणा दुकानाचे लाकडी काउंटर, लाल मिरचीचे पोते व इतर किरकोळ साहित्य जळून नुकसान झाले आहे. यात सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.