महिलेच्या गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST2021-04-11T04:22:04+5:302021-04-11T04:22:04+5:30
याबाबत नामदेव मधुकर माळी यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच पोलिसानी हरिचंद्र चंद्रकांत खुने याच्या विरुद्ध ...

महिलेच्या गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न
याबाबत नामदेव मधुकर माळी यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच पोलिसानी हरिचंद्र चंद्रकांत खुने याच्या विरुद्ध भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले, गंभीर जखमी महिला ही अंगणवाडी सेविका असून सध्या कोरोनामुळे काम बंद असल्याने शेतातील कामास जाते. मात्र हरिश्चंद्र खुने हा वर्षभरापाासून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तिने विरोध केला. तरीही तो ऐकत नसल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने तू पतीशी घटस्फोट घे, नाहीतर मुलांना व घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होता. तसेच घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करत होता. घटना घडलेल्या दिवशी ती महिला शेतात हरभरा काढण्याचे काम करीत असताना तिच्यावर वार केले. तेव्हा ती मोठ्याने ओरडली. तिच्या त्या आवाजाने फिर्यादीने जाऊन पाहताच तिच्या गळ्यावर वार केलेले दिसले. त्यानंतर तिला तातडीने बार्शीच्या दवाखान्यात दाखल केले. याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.