पोलीसांच्या अंगावर टिपर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, सोलापूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 15:05 IST2018-07-07T15:04:22+5:302018-07-07T15:05:19+5:30
सांगोला तालुक्यातील सोनंद येथे मंडल अधिकारी व अन्य कर्मचाºयांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी दिली़

पोलीसांच्या अंगावर टिपर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात वाळु माफियाची मुजोरी, गुंडगिरी वाढत जात आहे़ बार्शी तालुक्यात वाळु माफियाने पोलीसाच्या अंगावर वाळुचा टिपर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत पोलीसाला टिप्परमध्ये घालूनच टिप्पर पळवून नेला तर दुसºया घटनेत सांगोला तालुक्यातील सोनंद येथे मंडल अधिकारी व अन्य कर्मचाºयांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी दिली़
बार्शी तालुक्यातील कासारी येथील भांडेगांव चौकात पोलीसांनी एमएच १३ एएक्स ३७३५ हा वाळुचा टिपर अडवण्याचा प्रयत्न केला असता टिप्पर चालकाने टिप्पर वेडावाकडा चालवित पोलीसांच्या अंगावर घालून पोलीसांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ तर टिप्परवरील अन्य दोघांनी पोलीस कर्मचारी केंद्रे यांना टिप्परमध्येच घालून पळवून नेलं व वाटेत आमची वाळुची गाडी आडवायची नाही, तुम्ही अडविणारे कोण अशी दमदाटी करून नंतर वाटेत सोडून दिले़ याप्रकरणी तिघां जणांविरूध्द वैराग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सांगोला तालुक्यातील सोनंद येथे मंडल अधिकारी दत्तात्रय कांबळे व कर्मचाºयांनी अवैध वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडून तो सांगोला तहसिलकडे घेवून येत असताना आरोपी नितीन पाटील व अन्य दोघे तेथे आले व त्यांनी बाटलीत आणलेले पेट्रोल ट्रॅक्टरमधील कर्मचाºयांच्या अंगावर टाकत जाळून मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़