शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

सोलापूर पोलीस अधिक्षकांच्या दालनासमोर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:40 IST

अंगावर रॉकेल ओतून घेतले : बार्शीत चौघांवर गुन्हा

ठळक मुद्देपिडित युवतीच्या फिर्यादीनुसार बार्शी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा पीडित युवतीने आपल्यावर अत्याचार  झाल्याची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली होती

सोलापूर : जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या दालनासमोर एका युवतीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या ही घडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर या प्रकरणी पिडित युवतीच्या फिर्यादीनुसार बार्शी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. 

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, विविध प्रशासकीय कार्यालये असल्याने नेहमीच या परिसरात वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यातच  या पसिरात मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. अशावेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हे वृत्त वाºयासारखे पसरले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पीडित युवतीने आपल्यावर अत्याचार  झाल्याची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली होती. एका विवाहित इसमाने पीडित युवतीला नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.  पीडितेने त्या इसमाला माझ्याशी लग्न कर, असे म्हटले असता तो नेहमी टाळाटाळ करीत होता. दोघांच्या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. या प्रकाराने संबंधित इसमाने हात वर करीत जातीवाचक शिवीगाळ करुन तो गर्भ माझा नाही, असे म्हणून गोळ्या खाऊन खाली करण्यास सांगितले. गर्भ खाली केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पीडित युवतीला तिचा गर्भ खाली करण्यासाठी गोडावूनमध्ये नेऊन मारहाण करुन गोळ्या खाऊ घातल्या आणि तिचा गर्भपात केला. त्या बदल्यात तू पैसे घे म्हणून धमकावले, अशा आशयाची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांची धावाधाव; आरोपींचा शोध सुरु- पोलीस अधीक्षक कार्यालयात अचानक अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येच्या प्रकार घडल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तिला ताब्यात घऊन आत्महत्येपासून परावृत्त केले. नियंत्रण कक्षातील अधिकारी कदम यांनी तिचे गाºहाणे ऐकून पुढील कार्यवाहीसाठी तिला पोलिसांसमवेत बाशी पोलीस ठाण्याकडे नेले. तेथे तिच्या फिर्यादीनुसार कस्तुबा उर्फ अण्णा रमेश पेठकर, दादू रमेश पेठकर, शंभू शुंघे,अक्षय सिद्धेश्वर घेवारे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला असून,  संबंधित आरोपींचा शोध सुरु असलस्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसCrimeगुन्हा