पेट्रोल पंपासाठी अट्टाहास.. सुनेने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:28+5:302021-09-10T04:29:28+5:30

संतोष बाळकृष्ण पातूरकर (वय ५५, रा. शिवाई बिल्डिंग, धायरीगाव, सिंहगड रोड, पुणे) यांची मुलगी अबोली (वय ३०) हिचा ...

Attahas for petrol pump .. Gold took the gallows | पेट्रोल पंपासाठी अट्टाहास.. सुनेने घेतला गळफास

पेट्रोल पंपासाठी अट्टाहास.. सुनेने घेतला गळफास

संतोष बाळकृष्ण पातूरकर (वय ५५, रा. शिवाई बिल्डिंग, धायरीगाव, सिंहगड रोड, पुणे) यांची मुलगी अबोली (वय ३०) हिचा विवाह २५ जानेवारी २०१४ रोजी अंकित अंजीश मांगले (वय ३७, रा. लिंक रोड, जिजाऊ नगर पंढरपूर) यांच्या बरोबर झाला होता. विवाह झालेल्या तारखेपासून काल बुधवारपर्यंतच्या रात्री साडेनऊपर्यंत तिची सासू अमृता अंजीश मांगले, तिचा पती अंकित अंजीश मांगले तसेच तिची नणंद अपूर्वा रोहित भुमकर यांनी लग्नात आमच्या प्रतिष्ठेच्या मानाने मानपान केला नाही. लग्नात कमी सोने दिले. तुझे शिक्षणच कमी आहे. तसेच पेट्रोल पंप टाकण्यासाठी माहेरवरून पैसे आणावेत म्हणून सतत शारीरिक, मानसिक त्रास देऊन, मारहाण करून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत केले. अबोली अंकित मांगले हिने बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या (केशवलीला बंगला, जिजाऊ नगर,लिंक रोड,पंढरपूर) घरातील छताच्या सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार अबोलीचे वडील संतोष पातूरकर यांनी केली आहे. यामुळे अंकित अंजीश मांगले (वय ३४), अमृता अंजीश मांगले (वय ६०), अपूर्वा रोहित भुमकर (वय ३१) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत करीत आहेत.

Web Title: Attahas for petrol pump .. Gold took the gallows