धमकावत महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST2021-05-30T04:19:45+5:302021-05-30T04:19:45+5:30

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेला धमकावत अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप कदम याच्यावर कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

Atrocities on threatening women | धमकावत महिलेवर अत्याचार

धमकावत महिलेवर अत्याचार

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेला धमकावत अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप कदम याच्यावर कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित महिलेस आरोपी हा वारंवार फोन करून शरीरसंबंधांची मागणी करत होता. पीडित विवाहित महिला ही मागील महिन्यात माहेरी आली होती. तिच्या घरी कोणी नाही, याची संधी साधून तो आला. पीडित महिलेला तुझ्या दोन मुलांचा गळा दाबून मारून टाकेल, असे धमकावत अत्याचार केला. त्यानंतर २३ मे रोजी रात्री १० वाजता आरोपीने पीडित महिलेला फोन करून तू मला का भेटत नाही, तू भेटली नाही तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. तसेच फोटो व्हायरल करून बदनामी करेन, अशी धमकी दिली. घडलेला प्रकार पीडित महिलेने पतीला सांगितला. तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.

Web Title: Atrocities on threatening women