सोलापुरातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; विवाहित तरूण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:05 IST2021-01-02T13:05:33+5:302021-01-02T13:05:39+5:30

विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; पोलिसांनी आरोपी मुलाला फताटेवाडी येथून ताब्यात घेतले.

Atrocities on minors in Solapur; Married young man in police custody | सोलापुरातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; विवाहित तरूण पोलिसांच्या ताब्यात

सोलापुरातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; विवाहित तरूण पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका विवाहित तरुणाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.१ जानेवारी) उघडकीस आली. दरम्यान, विवाहित तरुणाला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अधिक माहिती अशी की, एका अल्पवयीन तरुणीची आरोपी तरुणासोबत सोशल मीडियातून ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत तरुणाने त्या मुलीशी जवळीक निर्माण केली. शुक्रवारी सकाळी कॉलेजला गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली. सायंकाळी उशिरा ती मुलगी घरी आली व आपल्याला आरोपी तरुणाने घेऊन गेल्याचे सांगितले. यामुळे मुलीच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाला फताटेवाडी येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Atrocities on minors in Solapur; Married young man in police custody