वाहन चालकाकडून महिला अधिकाऱ्यावर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:27 IST2021-08-14T04:27:21+5:302021-08-14T04:27:21+5:30

बार्शी : शासकीय सेवेतील एका महिला अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालकाने तिला जिवे मारण्याची धमकी देत पैशाची मागणी करून गुपचूप ...

Atrocities on female officers by motorists | वाहन चालकाकडून महिला अधिकाऱ्यावर अत्याचार

वाहन चालकाकडून महिला अधिकाऱ्यावर अत्याचार

बार्शी : शासकीय सेवेतील एका महिला अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालकाने तिला जिवे मारण्याची धमकी देत पैशाची मागणी करून गुपचूप काढलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दुष्कर्म केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी, धुळे, पुणे या ठिकाणी या महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, संबंधीत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जून ते ३० जूनदरम्यान ही घटना घडली आहे.

जून २०२० दरम्यान महेश करपे हा पीडितेची गाडी चालविण्यासाठी बदली ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. जुलै २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान ही महिला अधिकारी बार्शीत राहत होती. तो कोरोनाबाधित आढळल्याने यास त्याच्या घरमालकाने हाकलून दिले होते. दरम्यान, त्याच्या विनंतीवरून त्यास पीडितेने व तिच्या वडिलांनी घरात काही दिवस राहण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, त्याने पीडितेचा विनयभंग करीत तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच लग्न करतो, पतीला घटस्फोट दे, म्हणून त्रास देत होता. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बहिर करत आहेत.

Web Title: Atrocities on female officers by motorists