गतीमंद महिलेवर अत्याचार, २१ आठवड्याची गर्भवती; आरोपीचा शोध सुरू
By रूपेश हेळवे | Updated: April 8, 2023 15:16 IST2023-04-08T15:16:10+5:302023-04-08T15:16:29+5:30
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

गतीमंद महिलेवर अत्याचार, २१ आठवड्याची गर्भवती; आरोपीचा शोध सुरू
सोलापूर : गतीमंद महिलेवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ती २१ आठवड्याची गर्भवती आहे. ही घटना नुकतीच उघडकीस आली.
या प्रकरणी सदर बाझार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही अंदाजे ३५ वर्षाची असून तिला काही दिवसापूर्वी पोटदुखीसाठी २७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, तिच्यावर उपचार करताना पीडित महिला ही गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण याबाबत पीडित ही बोलण्याच्या मानसिकतेत नव्हती. यामुळे या प्रकरणी सदर बाझर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पीडितेवर सध्या उपचार सुरू आहेत.