राजकीय वादातून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:24+5:302021-02-08T04:20:24+5:30

माळशिरस : जिल्हा परिषद सदस्या मंगल वाघमोडे यांचे दीर राहुल बाजीराव वाघमोडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून, तो ...

Assassination from political controversy | राजकीय वादातून प्राणघातक हल्ला

राजकीय वादातून प्राणघातक हल्ला

माळशिरस : जिल्हा परिषद सदस्या मंगल वाघमोडे यांचे दीर राहुल बाजीराव वाघमोडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून, तो हल्ला राजकीय वादातून झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी १० जणांवर गुन्ह्य दाखल झाला आहे.

राहुल वाघमोडे हे दोघांसमवेत चाकोरे (ता. माळशिरस ) येथे बोलत थांबले होते. त्यावेळी एक कार व एक जीप येऊन थांबली. दोन्ही गाड्यांतून उतरलेल्या तरुणांनी राहुल वाघमोडे, सचिन कचरे, भारत पाटील, विष्णू पाटील, अनिल कचरे यांना जखमी केले.

याबाबत माळशिरसचे अक्षय पाटील, शुभम देवकाते, अंबादास पाटील, मयूर पाटील, ऋषिकेश पाटील, हनुमंत पाटील, विक्रम पाटील, संजय नरोटे, जयपाल पाटील व जयवंत पाटील या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Assassination from political controversy