संपत्तीच्या कारणावरुन गोगावमध्ये प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:27 IST2021-08-14T04:27:19+5:302021-08-14T04:27:19+5:30

अक्कलकोट : तुला नोकरी आहे, पगार आहे, कशाला लागते जमीन अन् घर जागा, असे म्हणत एका शिक्षकाला मारहाण करीत ...

Assassination in Gogaon for wealth reasons | संपत्तीच्या कारणावरुन गोगावमध्ये प्राणघातक हल्ला

संपत्तीच्या कारणावरुन गोगावमध्ये प्राणघातक हल्ला

अक्कलकोट : तुला नोकरी आहे, पगार आहे, कशाला लागते जमीन अन् घर जागा, असे म्हणत एका शिक्षकाला मारहाण करीत त्यांच्यावर भाऊकीतील मंडळींनीच जीवघेणा हल्ला केला. ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली.

लिंगराज ऊर्फ लिंगय्या बसलिंगय्या मठपती, चंद्रकला बसलिंगय्या मठपती, हिराबाई लिंगय्या मठपती (सर्व रा. गोगाव, ता.अक्कलकोट) असे संशयित आरोपींची नावे आहेत.

चनबसय्या गुरुमूर्ती मठपती हे शिक्षक आहेत. त्यांच्या हिश्श्याला मूळगावी गोगाव येथे घर जागा, शेतजमीन आले आहे. हिश्श्याप्रमाणे सर्वांनी प्रॉपर्टी घेऊ, विनाकारण तक्रार कशाला, असे म्हणत असताना तिघांनी मिळून मारहाण करू लागले. स्वत:ला वाचविण्यासाठी ते बाहेर पळू लागले. तेव्हा पाठीमागून सर्व जण येऊन काठीने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. मोरे करीत आहेत.

Web Title: Assassination in Gogaon for wealth reasons