बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आवर्जून विचारा मतदार यादीत नाव नोंदवले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:51+5:302021-09-10T04:28:51+5:30
मताचा अधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नाेंदवणे आणि ...

बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आवर्जून विचारा मतदार यादीत नाव नोंदवले का?
मताचा अधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नाेंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. यासाठीच गणेश-मखराची सजावट, गणेशदर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे, तसेच मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लाेकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडणे, मताधिकार बजावणे यासारख्या विषयांवर सजावटीतून जागृती करणे हाच उद्देश असल्याचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी सांगितले.
----
...अशी असतील पारितोषिके
या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे राेख रक्कम २१ हजार, ११ हजार, पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. याबराेबरच एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारिताेषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्यांनी छायाचित्र व चित्रफीत या गुगल अर्जावर भरून पाठवावी, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे.