अशोक वागळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:36+5:302021-04-24T04:21:36+5:30

यांचे निधन कुर्डूवाडी : ग्रामीण रुग्णांना माधवस्मृती रुग्णालयाच्या माध्यमातून अद्ययावत आणि किफायतशीर वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक विनायकराव वागळे ...

Ashok Wagle passes away | अशोक वागळे यांचे निधन

अशोक वागळे यांचे निधन

यांचे निधन

कुर्डूवाडी : ग्रामीण रुग्णांना माधवस्मृती रुग्णालयाच्या माध्यमातून अद्ययावत आणि किफायतशीर वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक विनायकराव वागळे (८५, कुर्डूवाडी, ता. माढा) यांचे शुक्रवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

डॉ. वागळे यांनी कुर्डूवाडीत ज्यावेळी कोणत्याही सुख-सुविधा उपलब्ध नव्हत्या. या काळात १९६५ ते २००५ पर्यंत रुग्ण सेवा केली आहे. त्या काळात ग्रामीण भागात शहरी भागातून येऊन काम करणारा सर्जन म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत होते. आपली रुग्णसेवा ही येथील गोरगरिबांसाठी कायम तत्पर आहे, त्यातून पैसे कमविण्याचा कधीही माझ्या आयुष्यात संबंध येणार नाही, हे त्यांचेच ब्रीद त्यांनी आयुष्यभर जोपासले. त्यामुळे त्यांचा आणि कुर्डूवाडीकरांचा जिव्हाळ्याचा संबंध होता.

२३अशोक वागळे-निधन

Web Title: Ashok Wagle passes away