महिलेला धक्का लागल्याने दोघांची जमावाकडून धुलाई, मिरवणुकीतील प्रकार

By रवींद्र देशमुख | Updated: April 24, 2023 15:18 IST2023-04-24T15:17:35+5:302023-04-24T15:18:04+5:30

डोक्याला,नाकाला झाली दुखापत

As the woman was shocked, both of them were washed by the crowd, as in the procession | महिलेला धक्का लागल्याने दोघांची जमावाकडून धुलाई, मिरवणुकीतील प्रकार

महिलेला धक्का लागल्याने दोघांची जमावाकडून धुलाई, मिरवणुकीतील प्रकार

रवींद्र देशमुख, सोलापूर: मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लेडीजच्या अंगावर का आला अशी विचारणा करणाऱ्या दोघांना नाचणाऱ्या १५ जणांच्या जमावाकडून चोप देण्यात आला. यात दोघा तरुणाच्या डोक्यास व नाकास दुखापत झाली. दोघांना रविवारी रात्री ११ च्या सुमारास उपचारासाठी दाखल केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाची सांगता मिरवणुक रविवारी रात्रीपर्यंत सुरु होती. यातील जखमी आशिष संतोष कांबळे (वय- १७) व संतोष कांबळे (वय- २२, रा. रेल्वे लाईन, फॉरेस्ट सोलापूर) हे दोघे तरुण महापौर बंगल्याजवळ मिरवणूक पाहत थांबलेले होते. जल्लोषात नाचणारे उत्सासाच्या भरात लेडीजच्या अंगावर येत असल्याचे पाहून जखमी दोघांनी नाचणाऱ्या १० ते १५ जणांच्या जमावाला सांगण्यास गेले. यावर जमावाकडून दोघा तरुणाच्या डोक्यावर व नाकावर ठोसा मारुन जखमी केले. रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

जखमींना रात्री ११ च्या सुमारास भाऊ सिद्धार्थ याने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद आहे.

Web Title: As the woman was shocked, both of them were washed by the crowd, as in the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.