सराफास पिस्तूलचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका आरोपीला अटक; पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:16 IST2021-01-01T04:16:18+5:302021-01-01T04:16:18+5:30

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने आरोपीला शिताफीने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर दोन महिन्यांच्या ...

Arrested for robbing Sarafas at gunpoint; Police cell | सराफास पिस्तूलचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका आरोपीला अटक; पोलीस कोठडी

सराफास पिस्तूलचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका आरोपीला अटक; पोलीस कोठडी

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने आरोपीला शिताफीने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर दोन महिन्यांच्या आत येथील पोलिसांनी परिसरातील सीसी कॅमेरे, श्वानपथकाच्या मदतीने, तांत्रिक कौशल्याचा वापर करून हल्लेखोरांपर्यंत पोहचले. दरम्यान, एक संशयित किशोर ऊर्फ अप्पा बाळू ढवळे (रा. कुर्डुवाडी) याला ताब्यात घेतले. त्याकडून अन्य तिघांची नावे उघड झाली आहेत. त्यामध्ये पुण्यातील सराईत गुन्हेगार नीलेश गायकवाड, मनोज हांंडे, अशोक कसबे यांनी किशोर ऊर्फ आप्पा ढवळे याच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अटक केलेल्या आरोपीस माढा न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी सांगितले. हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दत्ता सोमवाड, सागर गवळी, संभाजी शिंदे, अन्वर आतार, शिपाई माळी आदींनी ही कामगिरी केली आहे.

---------

Web Title: Arrested for robbing Sarafas at gunpoint; Police cell