क्षेत्र १०० गुंठे...दिवस ९० अन् उत्पन्न मिळाले दोन लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:25 PM2020-03-13T12:25:57+5:302020-03-13T12:28:20+5:30

वैरण, मक्याचे दुहेरी उत्पन्न; वाळूज येथील मोटे दाम्पत्याची यशोगाथा

Area 3 knots ... Day 49 and yields two lakhs! | क्षेत्र १०० गुंठे...दिवस ९० अन् उत्पन्न मिळाले दोन लाख !

क्षेत्र १०० गुंठे...दिवस ९० अन् उत्पन्न मिळाले दोन लाख !

googlenewsNext
ठळक मुद्देकमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक येते़ ग्रामीण भागात शेतीला पशुपालन हा मुख्य जोडव्यवसायऊस आणि फळपिकांइतके कष्ट आणि खर्च मक्याला येत नाही़पारंपरिक २० एकरात तीच पिके घेतली जातात. थोडा बदल, प्रयोग म्हणून मक्याचा प्रयोग केला

संभाजी मोटे 
वाळूज : पारंपरिक २० एकरात तीच पिके घेतली जातात. थोडा बदल, प्रयोग म्हणून मक्याचा प्रयोग केला. कमी पाण्यावर आणि कमी श्रमात हे पीक ९० दिवसांत घेणे शक्य झाले आहे़ चक्क शंभर गुंठ्यात दोन लाखांचे पीक निघाले़ ही किमया मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील एका तरुण दाम्पत्याने साधली आहे.

ज्ञानेश्वर मोटे आणि रेश्मा मोटे असे त्या शेतकºयाचे नाव आहे. वडील केशव मोटे आणि जांबुवती मोटे यांनी शेतामध्ये साथ दिली. 
प्रारंभी त्यांनी नांगरणी करून शेत स्वच्छ करून घेतले़ नंतर सरी सोडून जमीन लागवडीलायक करून घेतली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ड्रोन या वाणाच्या मक्याची लागवड केली़ एका महिन्यानंतर त्यांनी पहिली फवारणी केली. १०० गुंठे क्षेत्रात तीन बाय दीड अंतरावर लागवड केली. त्यानंतर दोन वेळेस खुरपणी केली. मक्याची वाढ पाच फूट झाल्यानंतर लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोराजिन निआॅन अस्त्र आणि फायटर या औषधांच्या पाच फवारण्या केल्या. तसेच वाढीसाठी शेणखत, युरिया, १०.२६.२६ ही खते वापरली़ ९० दिवसांत मका काढणीसाठी आला़ त्यातल्या त्यात दूध देणारी जर्सी गाय, म्हैस असणाºया पशुपालकांना एक गुंठा २ हजार रुपये दराने चाºयासाठी कणसासहित देण्यात आली़ लागवड, खुरपणी, खते फवारणीसाठी एकूण खर्च २० हजार रुपये झाला़ १०० गुंठे क्षेत्रात यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

त्याच क्षेत्रात इतर पिकेही घेतली
- शेतकरी मोटे यांना एकूण दहा एकर शेती आहे. त्यांनी ज्वारी, हरभरा आणि ऊस ही पिके घेतली. ते नेहमी या क्षेत्रावर वैरणीसाठी मक्याची लागवड करतात. गावालगत रोडच्या कडेला शेत आहे. परिसरातील देगाव, मुंगशी, भागाईवाडी, साखरेवाडी येथील पशुपालक वैरणीसाठी हिरवा चारा म्हणून मका घेऊन जातात. मका हे पीक ९० दिवसात काढणीला येते. परिसरात दुभती जनावरे जास्त आहेत़ जनावरांना वैरणीसाठी आणि दूधवाढीसाठी मक्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो़ 

कमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक येते़ ग्रामीण भागात शेतीला पशुपालन हा मुख्य जोडव्यवसाय आहे़ ऊस आणि फळपिकांइतके कष्ट आणि खर्च मक्याला येत नाही़ हे पीक कोणीही घेऊन स्वत:चा शेती व्यवसाय चांगल्यारित्या चालवू शकतो़ लष्करी अळींवर मात करीत घेतले दोन लाखांचे मकापीक घेतले़
- ज्ञानेश्वर मोटे, मका उत्पादक 

Web Title: Area 3 knots ... Day 49 and yields two lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.