सांगोलाच्या तहसीलदारपदी संजय खडतरे यांची नियुक्ती
By संताजी शिंदे | Updated: June 3, 2023 14:36 IST2023-06-03T14:36:31+5:302023-06-03T14:36:59+5:30
तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या तहसीलदारपदी ए. एम. इवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश १ जून रोजी काढण्यात आला आहे.

सांगोलाच्या तहसीलदारपदी संजय खडतरे यांची नियुक्ती
सोलापूर : सांगोलाच्या तहसीलदारपदी संजय भगवान खडतरे यांची नियुक्ती झाली आहे. तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या तहसीलदारपदी ए. एम. इवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश १ जून रोजी काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील एकूण ७४ जणांच्या बदल्या केल्या असून, सोलापूर जिल्ह्यात दोघांची नियुक्ती झाली आहे. पुणे येथील तहसीलदार संजय खडतरे यांची बदली सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात झाली आहे. संजय खडतरे हे मूळचे सांगोला तालुक्यातीलच आहेत. यापूर्वी त्यांनी सांगोला तहसील कार्यालयातच विविध पदांवर काम केले आहे. जिल्ह्यातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण तहसीलदारपदी ए. एम. इवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोनाली मेटकरी यांची बदली झाल्याने ती जागा रिक्त होती.
सांगोला तहसीलदार अभिजित सावर्डे पाटील यांची बदली झाल्याने पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी संजय खडतरे यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यालय प्रमुखांच्या सल्ल्याने आपला पदभार अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे. १५ दिवसांत पदभार घ्यावा, असे आदेशात सांगण्यात आले आहे.