शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाआघाडीचे काहीही होवो; सोलापूर मध्यची जागा माकप लढवणारच : अशोक ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:08 IST

महेश कुलकर्णी  सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही या ...

ठळक मुद्देसोलापुरात काँग्रेसने लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित महाआघाडी लोकसभेपुरती आहे, असे जरी म्हटले तरी विधानसभेचा प्रश्न अनुत्तररित राहतोकाँग्रेससमवेत माकपने केलेल्या महाआघाडीचे भवितव्य धोक्यात

महेश कुलकर्णी सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही या आघाडीत समावेश आहे. विधानसभेला हीच महाआघाडी कायम राहिली तरी सोलापूर मध्य ही विधानसभेची जागा आम्ही काहीही केले तरी लढविणार असल्याचे माकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य अशोक ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या प्रयत्नाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रतिसाद दिला असून, महाआघाडीत सहभागी होण्याचे मान्य केले आहे. यासाठी महाराष्टÑातील दिंडोरी आणि पालघर या दोन लोकसभेच्या जागा मागितल्या आहेत. हीच युती विधानसभेलाही कायम ठेवून माकपची ताकद असलेला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघही माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासाठी मागितला आहे. 

या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सध्या आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे असलेला हा विधानसभा मतदारसंघ देता येणार नाही, असे सोलापुरात वक्तव्य केले होते. याविषयी माकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य अशोक ढवळे यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशात महाआघाडीचे काय व्हायचे ते होवो, आम्ही सोलापूर मध्य विधानसभा लढविणार आहोत. एवढेच नव्हे तर तीन वेळा आमदार राहिलेले आमचे राज्य समितीचे सदस्य नरसय्या आडम मास्तर हेच याठिकाणी उमेदवार राहतील. यामुळे काँग्रेससमवेत माकपने केलेल्या महाआघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. महाआघाडी लोकसभेपुरती आहे, असे जरी म्हटले तरी विधानसभेचा प्रश्न अनुत्तररित राहतो. 

सोलापुरात काँग्रेसने लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे. आ. प्रणिती शिंदे या सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार आहेत. एकीकडे माकपने काँग्रेसला मदत करायची, असे ठरविले तरी आडम यांच्या महत्त्वाकांक्षी रे नगर घरकूल प्रकल्पास भाजपा सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर बँक गॅरंटीच्या प्रश्नामुळे या घरांना सरकारकडून मिळणारे अनुदानही अडकलेले असताना केंद्रात महाआघाडी झाली तरी सोलापुरात माकपचे कार्यकर्ते काँग्रेसला कितपत मदत करतील, ही शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणPraniti Shindeप्रणिती शिंदेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेस