राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 09:06 AM2021-05-04T09:06:52+5:302021-05-04T09:07:21+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Anuradha Dhoble, wife of former state minister Laxman Dhoble, has passed away in Pune | राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे पुण्यात निधन

राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे पुण्यात निधन

googlenewsNext

सोलापूर :  मोहोळचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील एका रुग्णालयात  ४ मे रोजी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८ वर्षाच्या होत्या.

‘सावली’ वुमेन्स फाउंडेशन च्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Anuradha Dhoble, wife of former state minister Laxman Dhoble, has passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.