शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Corona Virus Alert; ‘अँटी कोरोना’: चळवळीत मास्कसोबत रुमालही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 10:47 IST

सोलापुरात मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशची मागणी वाढली;  कोरोना व्हायरसचा सोलापूरकरांनी घेतला धसका

ठळक मुद्देअचानकपणे मास्कची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यास सज्जसध्या सोलापुरात कोरोना आजाराचा एकही संशयित रुग्ण नाही

सोलापूर : कोरोना व्हायरसचा सोलापूरकरांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम मास्क व सॅनिटायझर विक्रीवर झाला आहे. शहरातील औषधविक्रीच्या दुकानांमध्ये मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटायझर यांची विक्री वाढली आहे. याचा परिणाम या वस्तूंंच्या साठ्यांवर झाला आहे.

काही दिवसांपूर्वी संसर्गजन्य आजार असलेले रुग्ण व आॅपरेशन थिएटरमधील डॉक्टर हेच मास्क वापरत होते. त्यातच गुरुवारी सोलापुरात कोरोना आजाराचा रुग्ण आढळल्याची चर्चा झाली़ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यामुळे काल(गुरुवार)पासून मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. मास्कमध्ये अनेक प्रकार असून, त्याची पाच ते १५ रुपयांपर्यंत विक्री होत आहे. वॉशेबल मास्क हे ५० रुपयांना विकले जात आहेत.

औषधविक्री करणाºया दुकानांमध्ये हॅण्डवॉशचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सॅनिटायझरची मागणी वाढली असली तरी कमी प्रमाणात का असेना ते उपलब्ध आहेत. मास्कचा मात्र मोठा तुटवडा झाला आहे. मास्कची निर्मिती ही मुंबई येथील क ंपन्या करतात. या कंपन्यांनी मास्कचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. शहरात औषधविक्रीची दुकाने ८००, जिल्ह्यात २५०० इतकी आहेत. पुरवठादार सुमारे ३०० तर सर्जिकल वस्तू पुरविणाºया सुमारे ५० कंपन्या आहेत.

शहरात कोरोना संशयित एकही रुग्ण नाही

  • - कोरोना आजार सोलापुरात आल्याची चर्चा सारखी होत आहे. मात्र, सध्या सोलापुरात कोरोना आजाराचा एकही संशयित रुग्ण नाही. सामान्यपणे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर विषाणू पसरू नयेत यासाठी मास्क वापरावा. 
  • - मास्क उपलब्ध नसल्यास नाक-तोंडाला रुमाल बांधला तरी पुरेसे आहे. वापरानंतर रुमाल गरम पाण्याने धुवून स्वच्छ करणे योग्य आहे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विठ्ठल धडके यांनी केले आहे.
  • सिव्हिल हॉस्पिटल सज्ज
  • - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यास सज्ज झाले आहे. संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. यात सहा बेड तयार करण्यात आले आहेत.
  • - डॉक्टरांसाठी एन-९५ मास्क, गाऊन व इतर सुरक्षेचे साहित्य तर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, औषधे, सलाईन, इंजेक्शन, ग्लुकोमीटर, नेब्युलायझर तयार ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. शुभांगी धडके, डॉ. सचिन बांगर, डॉ. प्रसाद,डॉ. जमादार आदी डॉक्टर व परिचारिका यांची टीम तयार आहे.

एन-९५ मास्कची विचारणासामान्य लोक हे नेहमी साधा मास्क वापरतात. वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर हे एन-९५ मास्क वापरतात. वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना आजार होऊ नये यासाठी एन-९५ मास्कचा वापर केला जातो. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे सामान्य नागरिकदेखील एन-९५ मास्कची विचारणा करत आहेत. एन-९५ चा प्रत्येक मास्क पॅकेटबंद येतो. तो स्टॅण्डर्ड कंपनीचा असतो. त्यावर बॅच नंबरसह किंमत लिहिलेली असते. हा मास्क पीएम २.५ कणापासून ९० ते ९५ टक्के वाचविण्यास मदत करते. मास्कवर थ्री लेअर असतात.

अचानकपणे मास्कची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा करणाºया कंपन्यांकडे मास्कची मागणी केली. त्यांनी अ‍ॅडव्हान्स पैसे भरा, १० ते १५ दिवसांमध्ये मास्क देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मास्कची मागणी फक्त आपल्याकडेच नाही तर जगभर आहे. चीनमधूनही अनेक वस्तू आपल्याकडे येत असतात. हा आजार आपल्याकडे पसरु नये म्हणून तेथील वस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. - बसवराज मणुरे, अध्यक्ष, सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्यMedicalवैद्यकीय