शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरात भरतो आणखी एक मंगळवार बाजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 10:54 IST

५०० जणांना मिळाला नव्याने रोजगार; अर्धा किलोमीटर परिसरात वस्तूंची खरेदी-विक्री

ठळक मुद्दे एम़ आय. डी. सी. तील कामगारांसाठी उदयास आलेल्या प्रति मंगळवार बाजाराला दोनच वर्षांत व्यापक स्वरूप दर मंगळवारी सायंकाळी चार ते रात्री साडेनऊपर्यंत भरणाºया या बाजारात पंधरा ते वीस हजार ग्राहक या नव्यानेच उदयास आलेल्या बाजारात भाजीपाला, डाळी, मसाल्याचे पदार्थ, फळे, कपडे,धान्य, भांडी, सौंदर्य प्रसाधने

सोलापूर : मागील तीनशे वर्षांपूर्वीपासून भरणारे पेशवेकालीन मंगळवार बाजार हे सोलापूरची ओळख आहे. सोलापूरसह परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व ग्राहक यांच्यासाठी आजही मुख्य बाजार आहेत. शहराच्या हद्दवाढीनंतर नवनवीन नगरे आणि वस्त्यांमध्ये वाढ झाली़ अक्कलकोट रोड एम़ आय. डी. सी. मध्ये यंत्रमागधारक संघाचे कार्यालय ते सुनील नगर रस्त्यावर आता प्रतिमंगळवार बाजार भरू लागला आहे.

 या नव्यानेच उदयास आलेल्या बाजारात भाजीपाला, डाळी, मसाल्याचे पदार्थ, फळे, कपडे,धान्य, भांडी, सौंदर्य प्रसाधने अशा सर्वसामान्यांना लागणाºया सर्व वस्तू वाजवी किमतीत विक्रीस आहेत़ जवळपास पाचशे विके्रते या बाजारात असतात़ दर मंगळवारी सायंकाळी चार ते रात्री साडेनऊपर्यंत भरणाºया या बाजारात पंधरा ते वीस हजार ग्राहक विविध वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात.मंगळवारी दुपारी चार वाजता विके्रते आपली दुकाने मांडण्यात व्यस्त असतानाच एम़ आय. डी. सी. तील महिला कामगार हातात पिशव्या घेऊन  चालत बाजारात येत होत्या.बाजारात गजबज वाढतच चालली होती. कोणी भाजीपाला तर कोणी कपडे तर कोणी मसाले, लोणची अशा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत संपूर्ण बाजार फुलून गेल्याचे चित्र साडेसहापर्यंत पाहावयास मिळाले.

 किरकोळ चार-पाच भाजी विक्रेत्यांनी सुरू झालेल्या या एम़ आय. डी. सी. तील कामगारांसाठी उदयास आलेल्या प्रति मंगळवार बाजाराला दोनच वर्षांत व्यापक स्वरूप प्राप्त झाले़ कामगारांसोबत परिसरातील सुनील नगर, आशा नगर, कलावती नगर, अविनाश नगर, कामगार वसाहत नगर, गणेश नगर, नितीन नगरामधील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे़ येथील नागरिक मोठ्या प्रमाणात कुटुंबासह या आठवडी बाजारात खरेदीसाठी येत असतात़

शेतकºयांना लाभदायक...- दोड्डी, मुळेगाव, कुंभारी, तोगराळी, हणमगाव, गुर्देहळ्ळी, चिंचोळी, कर्देहळ्ळी, श्रिपनहळ्ळी, धोत्री परिसरातील शेतकरी भाजीपाला फळभाज्या येथील बाजारात विक्रीसाठी आपला माल आणतात़  जवळपास साठ टक्के शेतकरी स्वत: आपला माल थेट बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात़ त्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत़ त्यांची संख्या वाढत चालली आहे असे शेतकरी मळसिद्ध माळगे यांनी सांगितले़ या बाजारामुळे शहरात नवीन विके्रते तयार होऊन त्यांना रोजगार मिळाला आहे़

बाजारात मिळतात सर्वच वस्तू ...- भाजीपाला, फळभाज्या, हुलगा, मटकी, चना, मसूर, मटकी, ज्वारी, मूग, मोहरी, कारळ, चवळी, जवस, सर्व डाळी, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, भांडी, लहान मुलांचे कपडे, कंबर पट्टा, लोणची, पापड, लाडू, जिलेबी मिठाई आदी शहरातील मंगळवार बाजारात मिळणाºया सर्व वस्तू वाजवी किमतीत मिळत असल्याने आठवडाभर लागणाºया सर्व वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत असल्याचे निदर्शनास आले़

स्वस्त दरात भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तू येथील बाजारात उपलब्ध होत असल्याने कामगारांसाठी ते सोयीचे झाले आहे़ शेतकºयांकडून प्रत्यक्ष ग्राहकांनाच भाजी मिळत असल्याने ताजी व स्वस्त, वाजवी दरात मिळते़ त्यामुळे बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. - शंकर वडनाल, यंत्रमागधारक

सहा ते सात वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ व डाळी हातगाडीवर मांडून ग्राहकांची वाट पाहत असे. आता दर मंगळवारी मात्र चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे़ मंगळवारी येथील कामगारांचा पगार होत असल्याने ते खरेदीसाठी येतात़ पाचशे लोकांना रोजगार मिळतो़- नागनाथ चिलवेरी, विक्रेते

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजार