रेल्वे पुलाजवळ आणखी एक ऊसाचा ट्रक्टर उलटला, वाहतुकीची कोंडी; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 23:19 IST2023-01-03T23:19:15+5:302023-01-03T23:19:22+5:30
आठ दिवसांपूर्वी महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर कोसळ्याची घटना ताजी असतानाच शहरातील मरीआई चौकातील रेल्वे पूल परिसरात ऊस वाहतूक करणारा

रेल्वे पुलाजवळ आणखी एक ऊसाचा ट्रक्टर उलटला, वाहतुकीची कोंडी; सुदैवाने जीवितहानी टळली
विलास जळकोटकर
सोलापूर :
आठ दिवसांपूर्वी महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर कोसळ्याची घटना ताजी असतानाच शहरातील मरीआई चौकातील रेल्वे पूल परिसरात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अचानक उलटला. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वाहतुची कोंडी झाली.
मंगळवेढा रोडवरून भैय्या चौकाकडे निघालेला उसाचा ट्रॅक्टर रेल्वे पूल परिसरात आल्यानंतर अचानक उलटला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचे वृत्त समजताच फौजदार चावडीचे पोलीस तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी रेल्वे पुलावर झालेली वाहतकुची कोंडी दूर केली.
चालकाच्या मद्यप्राशनामुळे ट्राली उलटल्याची चर्चा
चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने पुलावरून ट्रॅक्टर आणि पहिली ट्रॉली रोडवर कोसळली. चालकाने मद्यप्राशन केल्याने ही घटना घडली असावी अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींमधून ऐकावयास मिळाली. उलटलेली ट्रॉली त्याच ठिकाणी ठेवून काही वेळानंतर दोन नंबरची ट्रॉली ट्रॅक्टर चालकाने पुढे नेल्याचे सांगण्यात आले.