अंजनगावच्या सर्पमित्राला सापांचा लागलाय लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:07 IST2019-08-05T15:03:50+5:302019-08-05T15:07:56+5:30

नागपंचमी विशेष; जनतेत करताहेत प्रबोधन

Anjangaon's serpentine started to suffer snakes | अंजनगावच्या सर्पमित्राला सापांचा लागलाय लळा

अंजनगावच्या सर्पमित्राला सापांचा लागलाय लळा

ठळक मुद्देअंजनगाव खेलोबा येथील सर्पमित्र सनातन नाईकनवरे सापांना धरून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम करत आहेतमाढा शहर व परिसरात आजपर्यंत लहान-मोठे जवळपास दीड हजार विषारी-बिनविषारी सर्प अत्यंत चपळाईने पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले सापांविषयी असणारी भीती त्यांनी अनेकांच्या मनातून घालवून अंधश्रद्धा घालवली

आयुब शेख
माढा : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील सर्पमित्र सनातन नाईकनवरे सापांना धरून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम करत आहेत. सापांप्रती असणारी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी अशा सापांचे प्रदर्शन ते भरवतात़ मागील ३० वर्षांत त्यांनी सापांशी मैत्रीच केली़ लागलेला लळा अजूनही सुटलेला नाही.
  
ते सर्प संवर्धन फाउंडेशनचे सदस्य आहेत़ माढा शहर व परिसरात आजपर्यंत लहान-मोठे जवळपास दीड हजार विषारी-बिनविषारी सर्प अत्यंत चपळाईने पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले आहे़ लहानपणामध्ये गावात सापाचा खेळ पाहून त्यांच्या मनात सापांबद्दल आत्मियता निर्माण झाली़ त्यामुळे त्यांच्या मनातील भीती गेली़ वयाच्या बाराव्या वर्षांपासून सापांचा छंद जोपासत आहेत़ 

माढा शहर, अनगर, विठ्ठलवाडी, देवडी, वाफळे, कुंभेज, खैराव, उपळाई खुर्द, उपळाई (बु़), कोंबडवाडी या परिसरात, शेतात, वस्तीवर सापाचं दर्शन झाले की अंजनगावमधून फोन करून पाचारण केले जातेi. त्यांनी आतापर्यंत सापांपासून अनेकांचे प्राण वाचवले आहेत़ याबरोबरच सापांविषयी असणारी भीती त्यांनी अनेकांच्या मनातून घालवून अंधश्रद्धा घालवली आहे़ भैय्या पाटेकर, भागवत चौगुले, सचिन चौगुले, समाधान नाईकनवरे, संदीप लटके, अतुल काळे, रामचंद्र रावडे, बिभिषण चौगुले असे अनेक सर्पमित्र त्यांनी घडवले आहेत़ 

१५ वेळा सर्पदंश 
आपल्या देशात नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चार जातीचे विषारी साप आहेत़ आपल्या परिसरामध्ये नाग व घोणस या दोन विषारी  सापांचे प्रमाण अधिक आहे़ सापांना हाताळत असताना आतापर्यंत त्यांना जवळपास पंधरावेळा दंश केला आहे़ या सर्पदंशात त्यापैकी पाच विषारी नाग होते़ दहा वर्षांपूर्वी अंजनगाव खेलोबा येथे दिलीप चौगुले यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर नागाने डाव्या हाताच्या अंगठ्यावर दंश केला़ त्याक्षणी नवीन ब्लेडने रक्त बाहेर काढले आणि सर्वात सर्पदंश झालेल्या वरील बाजूस पट्टीने बांधून विष पसरवणे तत्काळ थांबवले़ 

 साप शेतकºयांचा मित्रच
- साप हा शेतकºयांचा मित्र आहे़ तो शेतातील उंदरांची संख्या कमी करून अप्रत्यक्षरीत्या मदत करतो़ 
- अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंजनगावात नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्षात साप ठेवून महिलांकडून त्याची पूजा  करण्याची संधी देतात़ 
- तो दूध पीत नाही़ त्याला कान नाहीत़ त्याला मेंदू नाही ना त्याला स्वत:चे घर नाही़ त्याला केस नसतात़
- तो शेतकºयाचा मित्र आह़े  पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्याला साथ दिली पाहिजे

Web Title: Anjangaon's serpentine started to suffer snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.