And the tent collapsed on the police in Solapur | अन् सोलापुरातील पोलिसांवर मंडप कोसळला; पुढे काय झाले ते पहा...!

अन् सोलापुरातील पोलिसांवर मंडप कोसळला; पुढे काय झाले ते पहा...!

ठळक मुद्दे- सोलापूर शहरात विधानसभेच्या मतदानाला सुरूवात- दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारीत झाली वाढ- पावसामुळे सकाळच्या सत्रात झाले कमी मतदान

सोलापूर : सोलापूर शहरातील महापालिका शाळा नंबर १९ येथे असलेल्या मतदान केंद्रासमोरील मंडप पावसामुळे पोलीसांवर कोसळला़ सुदैवाने या घटनेत पोलीसांना काहीही झाले नाही. सकाळी नऊच्या सुमारास शाहीर वस्तीमधील महापालिका शाळेच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली.

सोलापूर शहरात रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे मतदान केंद्र परिसरात पाणी साठून दलदल निर्माण झाली़ शाळेभोवती काळी माती असल्याने प्रवेशव्दारावर उभारण्यात आलेल्या मंडपाचे खांब चिखलात रूतल्याने मंडप कोसळला. यावेळी प्रवेशव्दारावर बंदोबस्त करीत असलेल्या तीन पोलीस होते. सुदैवाने कोणत्याही पोलीसाला इजा झाली नाही. पडलेला मंडप गुंडाळून ठेवण्यात आला. महापालिकेच्या आपतकालीन कक्षाला माहिती दिल्यानंतर महापालिकेच्या अधिकाºयांनी धाव घेतली. लागलीच तीन डंपर मुरूम अंधरूण रस्ता केला पण मतदारांना चिखलातूनच ये-जा करावी लागत आहे.

Web Title: And the tent collapsed on the police in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.