आंघोळीस गेला अन् भीमा नदीपात्रात वाहून गेला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST2021-09-21T04:24:47+5:302021-09-21T04:24:47+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या बायपास मार्गाचे काम सुरू असून भीमा नदीवर पुलाचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर काम ...

Anbhima went to the bath and was carried away in the river basin ... | आंघोळीस गेला अन् भीमा नदीपात्रात वाहून गेला...

आंघोळीस गेला अन् भीमा नदीपात्रात वाहून गेला...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या बायपास मार्गाचे काम सुरू असून भीमा नदीवर पुलाचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर काम करीत असलेला हुसेन रझा हा युवक गुरसाळे बंधाऱ्यावर स्नानासाठी आला होता. या वेळी त्या तरुणासोबत अन्य काही मित्रही स्नानासाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे, त्याआधी त्यांनी सेल्फीही घेतली होती.

सध्या वीर धरणातून नीरा नदीला सोडलेले पाणी भीमा नदीला येत आहे, त्यामुळे नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागासह तालुका महसूल विभाग आणि पोलिसांनीही केले आहे. तरीही हुसेन रझा पोहण्यासाठी गेला होता. हुसेन वाहून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हुसेनचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

Web Title: Anbhima went to the bath and was carried away in the river basin ...