घरातील कपाटावर येऊन बसले घुबड; पक्षीप्रेमींनीकडून सुटका, बॉक्समध्ये केले बंदिस्त
By शीतलकुमार कांबळे | Updated: December 29, 2023 19:09 IST2023-12-29T19:09:38+5:302023-12-29T19:09:52+5:30
सहसा नजरेला न दिसणारे दुर्मिळ घुबड ओरिएंटल स्कॉप आऊल पक्षी दत्त चौकातील एका घरात आले.

घरातील कपाटावर येऊन बसले घुबड; पक्षीप्रेमींनीकडून सुटका, बॉक्समध्ये केले बंदिस्त
सोलापूर : सहसा नजरेला न दिसणारे दुर्मिळ घुबड ओरिएंटल स्कॉप आऊल पक्षी दत्त चौकातील एका घरात आले. तिथे असलेल्या कपटावर ते बसले. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी या घुबडास सुरक्षितपणे पकडून त्याच्या नैसर्गिक वातावरणात सोडून दिले. गुरुवार २८ डिसेंबर रोजी दत्त चौक परिसरातील एका घरात घुबड शिरले. याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या (एनसीसीएस) सदस्यांना देण्यात आली. काही वेळातच एनसीसीएसचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता ते घुबड ओरिएंटल स्कॉप आऊल म्हणजेच घुबड असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पुठ्याचा बॉक्स घेतला. अत्यंत शिताफीने त्यांनी त्या घुबडास बॉक्समध्ये बंदिस्त केले. सुरक्षितरीत्या घुबडास नैसर्गिक आवारात सोडून देण्यात आले. पिंगळ्यापेक्षा या घुबडांची उंची असते.
ओरिएंटल स्कॉप आऊल घुबडांची संख्या कमी होत असल्याने यांना वन्यजीव कायद्यांअंतर्गत संपूर्ण संरक्षण आहे. हे घुबड अत्यंत लाजाळू असून, रात्री शिकार करते व पानांच्या झुबक्यामध्ये दिवसा विश्रांती घेत असते. छोटे पण अत्यंत देखणे राखाडी अंगावर बारीक बारीक तांबूस ठिपके उठून दिसते. या पक्षाचे खाद्य उंदीर, सरडे, पाली आणि कीटक हे असल्याने निसर्गात वृक्ष संवर्धनाचे काम करते.
ओरिएंटल स्कॉप आऊल हे दुर्मिळ प्रकारचे घुबड आहे. या घुबडांची संख्या फार कमी आहे. सोलापुरात फक्त दुसऱ्यांदाच असे घुबड आमच्या पाहण्यात आले. दत्त चौकातील घुबड हे उजेड किंवा पाल पाहून घरात आले असावे. - भरत छेडा, मानद वन्यजीव रक्षक