शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

सोलापूर जिल्ह्यातील ७४ करदात्यांनी मागे घेतले कर्जमाफीचे अर्ज, अजनाळे, कमलापूर,सोनंद, बारलोणीच्या अनेकांचा यामध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:50 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलेल्यांपैकी जिल्ह्यातील ७४ लोकांनी कर्जमाफीचा फायदा नको असे अर्ज दिले असून, हे शासकीय व निमशासकीय सेवेतील करदाते आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाचावडीवाचनात आक्षेप आल्याने वगळण्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने वरिष्ठांना कळविले नोकरदार, पदाधिकाºयांनी अर्जाद्वारे लाभ नाकारला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलेल्यांपैकी जिल्ह्यातील ७४ लोकांनी कर्जमाफीचा फायदा नको असे अर्ज दिले असून, हे शासकीय व निमशासकीय सेवेतील करदाते आहेत.राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्यानुसार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे होते. शासनाने शासकीय व निमशासकीय नोकर, करदाते तसेच संस्थांच्या पदाधिकाºयांना यातून वगळले होते. अशातही काहींनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी कर्जमाफीचा फायदा नको म्हणून अर्ज दिले आहेत. या अर्जदारांना चावडीवाचनात आक्षेप आल्याने वगळण्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने वरिष्ठांना कळविले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगीचे दोन, अक्कलकोट तालुक्यातील केगाव बु., दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस(ग), मोहोळ तालुक्यातील नजीकपिंपरी, उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव, माळशिरस तालुक्यातील तांबवेच्या प्रत्येकी एका शेतकºयाचा समावेश आहे.  सांगोला तालुक्यातील अजनाळेचे सर्वाधिक १३ शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीचा फायदा नाकारला आहे. यलमार मंगेवाडीचे तीन, कमलापूरचा एक, खवासपूरचे पाच, महिमचे चार,वाकीघेरडीचे दोन, सोनंदचे आठ आदी शेतकºयांची नावे चावडीवाचनात कमी करण्याची शिफारस केली आहे. बार्शी तालुक्यातील बार्शी शहरातील तीन, ज्योतीबाचीवाडीचा एक, शेळगाव(आर) व काटेगावचे प्रत्येकी दोन, कळंबवाडी पान, खामगाव,कोरफळे, मुंगशी(आर), रुई, रऊळगाव,वालवड प्रत्येकी एक, पंढरपूर तालुक्यातील करकंब व कोर्टी प्रत्येकी एक, माढा तालुक्यातील ढवळस, जाधववाडी मो. प्रत्येकी एक, बारलोणीचे १० तर करमाळा तालुक्यातील मलवडीचा एक तर केत्तूर येथील पती-पत्नी अशा दोघांचा कर्जमाफी नाकारणाºयांमध्ये समावेश आहे. ---------------------नोकरदार अन् पदाधिकारी... शासनाने ज्यांना कर्जमाफीचा फायदा घेता येणार नाही अशांची यादी अगोदरच जाहीर केली होती. असे असतानाही अनेक करदात्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहेत. अगोदर अर्ज भरुन नंतर चूक लक्षात आल्याने ७४ शेतकरी, नोकरदार, पदाधिकाºयांनी अर्जाद्वारे लाभ नाकारला आहे. अनेकांनी अशातही अर्ज भरले असून, आता तपासणीत असे लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. लाभ नाकारणाºयांमध्ये शासकीय नोकरदार, निमशासकीय कर्मचारी, मजूर संस्थांचे अध्यक्ष, निवृत्तीवेतन धारक, आयकरदाता, पतसंस्था पदाधिकारी आदींचा समावेश आहे.