अमिताभ बच्चन येणार सोलापुरात; नाट्य संमेलनाचे करणार उद्घाटन 

By शीतलकुमार कांबळे | Updated: December 28, 2023 13:11 IST2023-12-28T13:10:45+5:302023-12-28T13:11:17+5:30

पालकमंत्र्यांची ग्वाही : २६ जानेवारी रोजी संमेलनास सुरुवात

Amitabh Bachchan will come to Solapur; Theater conference will be inaugurated | अमिताभ बच्चन येणार सोलापुरात; नाट्य संमेलनाचे करणार उद्घाटन 

अमिताभ बच्चन येणार सोलापुरात; नाट्य संमेलनाचे करणार उद्घाटन 

सोलापूर : जानेवारी महिन्यात शहरात विभागीय नाट्य संमेलन सोलापुरात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी होणार आहे. त्यांना सोलापुरात आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रयत्न करणार आहेत.

विभागीय नाट्य संमेलन २६ ते २८ जानेवारी दरम्यान सोलापुरात होणार आहे. या नाट्य संमेलनाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, २८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी अमिताभ बच्चन यांना उद्घाटनासाठी बोलविण्याची मागणी करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमिताभ बच्चन यांना सोलापुरात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

अमिताभ यांच्याशी थेट संपर्क नसला तरी मनात आणले तर आपण त्यांना सोलापुरात आणू शकतो. आशिष शेलार यांचा अमिताभ बच्चन यांचा चांगला परिचय आहे. त्यांच्या माध्यमातून सोलापुरात नाट्य संमेलनासाठी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. अमिताभ बच्चन यांना पत्र पाठवू त्यांना सोलापुरात आणण्यासाठी जी काही व्यवस्था करण्याची गरज असेल ती व्यवस्था करु असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Amitabh Bachchan will come to Solapur; Theater conference will be inaugurated