प्रसन्नदाता मंदिर ट्रस्टला रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:12+5:302020-12-31T04:23:12+5:30

बार्शी : पुष्पाबाई अशोक कुंकूलोळ यांचे वतीने प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून मानव सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात ...

Ambulance to Prasannadata Mandir Trust | प्रसन्नदाता मंदिर ट्रस्टला रुग्णवाहिका

प्रसन्नदाता मंदिर ट्रस्टला रुग्णवाहिका

बार्शी : पुष्पाबाई अशोक कुंकूलोळ यांचे वतीने प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून मानव सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली. दत्त जयंतीचे औचित्य साधून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले, स्व.पुतळाबाई कुंकूलोळ यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम हाती घेण्यात आला.

यावेळी अभय कुंकूलोळ, राहुल कुंकूलोळ, रोनक, योग व पलक कुंकूलोळ, ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता, बंडू माने, बसवेश्वर गाढवे, प्रमोद भंडारी, अमोल यवनकर, नितीन शेटे, डॉ. बेताळे, राजकुमार मंजुगडे, बापू झालटे, अरुण येळे, तम्मा विभूते उपस्थित होते. कार्डियाक सुविधेसह असलेल्या या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, डॉक्टर, नर्स या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

---

फोटो : ३० बार्शी कुंकूलोळ

कुंकूलोळ परिवाराच्या वतीने मानवसेवेसाठी प्रसन्नदाता मंदिर ट्रस्टला रुग्णवाहिका प्रदान करताना अभय कुंकूलोळ, कमलेश मेहता, पलक कुंकूलोळ, राहुल कुंकूलोळ

Web Title: Ambulance to Prasannadata Mandir Trust