शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी रस्त्याचा प्लॅन बारगळला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

सोलापूर : आसरा परिसरातून विजापूर रोडला जोडणारा नवा रस्ता करण्याचा ‘प्लॅन’ बारगळला आहे. त्याऐवजी आसरा रेल्वे उड्डाण पुलाची रुंदी ...

सोलापूर : आसरा परिसरातून विजापूर रोडला जोडणारा नवा रस्ता करण्याचा ‘प्लॅन’ बारगळला आहे. त्याऐवजी आसरा रेल्वे उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याच्या पर्यायावर महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याबाबत महापालिका आराखडा तयार करणार आहे.

विजापूर रोडवरील जडवाहने आसरामार्गे वळविल्यानंतर आसरा रेल्वे उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी पुढे आली. यासाठी महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यादरम्यान होटगी रोडवरून विजापूर रोडला जोडणारा आणखी रस्ता व्हावा, असा विचार काही जणांनी मांडला. मनपा अधिकाऱ्यांनी चेतन फाैंड्री ते जामगुंडी मंगल कार्यालय असा रस्ता करता येऊ शकतो का, यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला. याबद्दल नगर अभियंता संदीप कारंजे म्हणाले, या सर्व्हेनंतर नवा रस्ता उपलब्ध करून देणे सध्या शक्य होणार नसल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. त्याला काही तांत्रिक कारणेही आहेत. याउलट रेल्वे पुलाची रुंदी वाढविण्याचा विचार होऊ शकतो. नवा पूल रेल्वे यंत्रणाच उभारेल. मात्र, नवा पूल किती रुंदीचा असावा. तांत्रिकदृष्ट्या नवा पूल बांधणे शक्य आहे का? त्यासाठी काय करावे लागेल, याबद्दलचा अहवाल महापालिका खासगी एजन्सीकडून घेईल. एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे.

----

शासनाकडून पैसे आल्यानंतरच रस्ता दुरुस्ती

आसरा येथील उड्डाण पुलाची चाळण झाली आहे. लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नवा रस्ता केव्हा होईल, असे विचारले असता कारंजे म्हणाले, पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले. शासनाने नव्या रस्त्यांसाठी अहवाल मागवले होते. यात आसरा ते विजापूर रोड या रस्त्याचाही प्रस्ताव देण्यात आला. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतरच नवा रस्ता होईल.

----

खासदारांनी द्यावा निधी

आसरा ते विजापूर रोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासन निधीची वाट पाहता महापालिकेने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याकडून निधी उपलब्धतेबाबत पत्र घ्यावे. खासदारांनी जुळे सोलापूरवासीयांची गरज लक्षात घेता तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी यसदी फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सिद्धाराम डोमनाळे यांनी केली.

-------------

फोटो : आसरा रेल्वे पुलावर खड्डे पडले आहेत. लोक जीव मुठीत घेऊनच वाहने चालवितात.