सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:33+5:302020-12-05T04:45:33+5:30
आमदार देशमुख यांनी यावेळी मानकरी राजशेखर हिरेहब्बूसह गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला ...

सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना परवानगी द्या
आमदार देशमुख यांनी यावेळी मानकरी राजशेखर हिरेहब्बूसह गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोनाचे सावट आहे. सिद्धेश्वर भक्त शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करतील. धार्मिक विधींची तयारी सुरू झालेली आहे. हे पाहता प्रशासनाने या विधींना परवानगी द्यावी, असे सांगितले. धार्मिक विधींमध्ये दरवर्षी किती लोक सहभागी असतात. यंदा किती लोक सहभागी होतील याबद्दलही आयुक्तांनी देशमुख आणि हिरेहब्बू यांच्याकडे विचारणा केली. याबद्दलही देशमुखांनी माहिती दिली. यावेळी नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, विनायक विटकर, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
-
धार्मिक विधींना परवानगी, मात्र गड्डा यात्रेवर निर्बंध
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या़त्रेबाबत बैठक घेतली नव्हती. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत लवकरच बैठक होईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी धार्मिक विधींना परवानगी मिळेल, मात्र होम मैदानावर भरणाऱ्या गड्डा यात्रेवर निर्बंध येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.