शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भीमा नदीवरचे सातही बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:49 IST

कर्नाटककडे जाणारी वाहने नदीकाठी खोळबली; पूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी

ठळक मुद्देपूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी केली तहसीलकडे एक इंजिन बोट , पाच लाईफ जॅकेट  आणि आठ लाईफ रिंग उपलब्धगरजेनुसार नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याची तयारी

सोलापूर : उजनी धरण आणि नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , भंडारकवठे  ,सादेपूर, औज (म)  आणि चिंचपूर यासह अन्य दोन असे सातही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्यात बुडाले आहेत या पूर स्थितीमुळे कर्नाटकाकडे जाणारी अनेक वाहने नदीकाठीच खोळंबल्याचे चित्र दिसून येते.

 आज सकाळपासून भीमा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे़ सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान वडापूर बंधारा पाण्याखाली गेला त्यामुळे वडापूरहुन सिद्धापूर मंगळवेढाकडे जाणारी वाहने जागेवरच थांबली भंडारकवठे च्या बंधा?्यावर पाणी आल्याने शेतक?्यांची ये जा थांबली. सादेपुर , औज (म) आणि चिंचपूर बंधा?्यावर दुपारी पाणी वाढल्याने कर्नाटककडे जाणारी वाहतूक खोळंबली .रात्री उशिरापर्यंत बंधा?्याजवळ नागरिक पाणीपातळी कमी होण्याची वाट पहात थांबले होते.

दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार रमा जोशी यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या तेथील संभाव्य पूर स्थितीचा आढावा घेतला ग्रामस्थांना रात्री सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पाण्याचा विसर्ग वाढला तर तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले

नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशाराभीमा नदीकाठी असलेली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , कुसुर , खानापूर,  तेलगाव , भंडारकवठे, लवंगी ,चिंचपूर, बाळगी ,टाकळी, हत्तरसंग ,कुडल, कारकल, कुरघोट ,बोळकवठे , औज (म) या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . या गावात प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे  . टाकळी , सादेपुर येथे पोलीस तर वडापूर येथे जलसंपदा विभागाचे कर्मचारी तैनात आहेत .अन्यत्र महसुलचे मंडल अधिकारी , तलाठी ,कोतवाल यांची दक्षता पथकं सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली .विसर्ग वाढला तर वस्त्यांना धोकासद्यस्थितीत पूरस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र रात्री भीमा नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यास कुसुर , खानापूर, तेलगाव आणि लवंगी या नदीलगत असलेल्या गावांना धोका संभवतो. नदीकाठच्या शेतातील वस्त्यांत राहणारे शेतकरी , ग्रामस्थांना अन्यत्र हलवावे लागणार आहे .अशा वस्त्यांची प्रशासनाने पाहणी केली आहे .त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .तशी स्थिती उद्भवली तर त्यांच्या गावातील जुन्या घरात , नातळगांकडे , शाळांमध्ये हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे .आपत्ती व्यवस्थापन सज्जपूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी केली आहे . तहसीलकडे एक इंजिन बोट , पाच लाईफ जॅकेट  आणि आठ लाईफ रिंग उपलब्ध आहेत . गरजेनुसार नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले .

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरWaterपाणीwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण