अहो आश्चचर्यम... रशिया, कॅनडाहून सोलापुरात आले छोट्या कानाचे घुबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 18:53 IST2021-12-19T18:53:14+5:302021-12-19T18:53:20+5:30
छोट्या कानाच्या घुबडाचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

अहो आश्चचर्यम... रशिया, कॅनडाहून सोलापुरात आले छोट्या कानाचे घुबड
सोलापूर : छोट्या कानाच्या घुबडांचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. दरवर्षी हे पक्षी रशिया, कॅनडा, अमेरिका, अर्जेंटिना या देशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या सोलापूर जिल्ह्यात अडीच ते तीन महिने मुक्कामी येतात. या पक्ष्यांचे वास्तव्य माळरानावर असल्याची माहिती वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सर्कलचे संतोष धाकपाडे यांनी दिली.
छोट्या कानाचे घुबड हा गवतामध्ये इतका मिसळून जाते की, त्याला शोधणं एकदम कठीण जाते. तो घुबड पक्षी उडाला तरच तो नजरेस पडतो. त्याला उघड्या डोळ्यांनी शोधणे अवघड असते. संतोष धाकपाडे व प्रदीप कदम हे बोरामणी येथील माळरानावर पक्षी निरीक्षण करताना हा पक्षी दिसला.