शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

अकलूजने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी द्यावी; शेकापचे जयंत पाटील म्हणाले...

By राकेश कदम | Published: March 17, 2024 4:45 PM

आम्ही केवळ विजयदादांनी बाेलावले म्हणून आलाे हाेताे. आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे रामराजे म्हणाले.

साेलापूर -  माढा लाेकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार हाेण्याची शक्यता आहे. भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे अकलूजचे माेहिते-पाटील बंडाच्या पावित्र्यात आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळर, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह माेहिते-पाटील यांची भेट घेतली. अकलूजच्या भूमीने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची कामगिरी केली आहे. यापुढेही या भूमीने अशीच कलाटणी द्यावी अशी अपेक्षा आहे, अशी भूमिका  शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांसमाेर मांडली. 

अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर रविवारी दुपारी रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, जयंत पाटील यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासाेबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील शेकापाचे डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्याचे शिवाजीराजे कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते. धैर्यशील माेहिते-पाटील, शिवतेजसिंह माेहिते-पाटील, अर्जुनसिंह माेहिते-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. बंगल्यावर सुमारे तासभर सर्व नेत्यांची चर्चा झाली. आम्ही केवळ विजयदादांनी बाेलावले म्हणून आलाे हाेताे. आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे रामराजे म्हणाले. मात्र जयंत पाटील यांनी वेगळे संकेत दिले. अकलूजकरांनी राज्याच्या राजकारणाला कलाटण द्यावी असे पाटील म्हणाले.

टॅग्स :madha-pcमाढाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर