अकलूज राजधानी अन् बारामती काशी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:28 IST2021-09-08T04:28:36+5:302021-09-08T04:28:36+5:30

अरं त्या डाॅक्टरला म्हण मामाचा वरदहस्त हाय..! गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातलं रोपळे गाव बोगस डॉक्टरामुळं चांगलंच चर्चेत आलं. ...

Akluj Rajdhani Anbaramati Kashi .... | अकलूज राजधानी अन् बारामती काशी....

अकलूज राजधानी अन् बारामती काशी....

अरं त्या डाॅक्टरला म्हण मामाचा वरदहस्त हाय..!

गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातलं रोपळे गाव बोगस डॉक्टरामुळं चांगलंच चर्चेत आलं. त्याच्याविरुद्ध सरपंचानं तक्रार केली अन् आरोग्य यंत्रणेनंही पाऊल उचलून कारवाई केली. पोलिसात तक्रार दाखल झाली. गुन्हा नोंदला.. पोलीस कोठडी मिळाली अन् जामीनही मिळाला. पुन्हा त्या डॉक्टराचा दवाखाना सुरू झाला. या डॉक्टरावर म्हणे यापूर्वीही गुन्हे दाखल झाले. पण काही दिवसांनं पुन्हा दवाखाना सुरू होतो. हे आता गावकऱ्यांना चांगलं माहिती झालंय. नेमकी काय गोम आहे याची चौकशी केली असता संबंधित डॉक्टरवर गावातल्याच माजी पंचायत समिती सदस्यांची मेहरनजर आहे म्हणे. ते संजयमामाचे समर्थक आणि ज्या सरपंचानं डॉक्टरविरुद्ध तक्रार केेली ते म्हणे करमाळ्याचे आबा अन् मोहिते-पाटील गटाचे आहेत. अन् तो डॉक्टरही मामाचं नावं सांगतो म्हणे. त्यामुळं तक्रार केली की दवाखाना बंद होतो अन् काही दिवसांनी पुन्हा सुरू होतो. ‘अरं त्या डॉक्टरला म्हणं मामाचा वरदहस्त आहे..! अशी खुमासदार चर्चा आता गावभर सुरू आहे.

Web Title: Akluj Rajdhani Anbaramati Kashi ....