शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अक्कलकोट परिसरातील जैवविविधतेचा खजिना दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:20 IST

जागतिक जैवविविधता दिन विशेष; सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणे जैवविविधतेने नटलेली...

ठळक मुद्देनामशेष होण्याच्या मार्गावर असलेले अनेक पक्षी अक्कलकोट परिसरात येतातकाही दुर्मिळ पक्षी या परिसरात अंडी देखील घालत असल्याने ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बाब आहेनैसर्गिक तसेच कृत्रिम तलावात पाणी साचते. कुरनूर धरणामुळे नटलेली जैवविविधता दुर्लक्षित

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक ठिकाणे ही जैवविविधतेने नटलेली आहे. मात्र आपल्यापुढे नान्नज, हिप्परगा आदी भागांची चर्चा होते. अक्कलकोट तालुक्यातही जैवविविधता असून, मागील काही वर्षांपासून याकडे पर्यावरणप्रेमी लक्ष वेधत आहेत. यामुळे दुर्लक्षित असलेली जैवविविधता समोर आणण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी येथे काम करण्याची गरज आहे.

अक्कलकोट तालुक्यात कुरनूर धरण ही जमेची बाजू आहे. सोलापूर शहरात समतल भाग आहे. अक्कलकोट परिसरात डोंगर नसले तरी उंचवटा असलेला भाग आहे. यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावात पाणी साचते. कुरनूर धरणामुळे नटलेली जैवविविधता दुर्लक्षित आहे.अक्कलकोट येथील राजवाड्यामध्ये प्राण्यांची शिकार केलेले अवशेष आहेत. खूप वर्षांपूर्वी शिकारी झाल्या होत्या. त्याच्या नोंदी मिळाल्यास त्या प्राण्यांचा नेमका परिसर समजेल. तिथे योग्य त्या उपाययोजना करून पशू-पक्ष्यांसाठी ती जागा अधिक योग्य करता येईल.

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले अनेक पक्षी अक्कलकोट परिसरात येतात. इंडियन स्किमर, पांढºया भुवईचा बुलबुल पक्षी आढळतो. काही दुर्मिळ पक्षी या परिसरात अंडी देखील घालत असल्याने ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. मागील चार वर्षांपासून पांढºया भुवईचा बुलबुल आढळत आहे.

 कवडी मैना, करड्या डोक्याची मैना, गुलाबी मैना, गुलाबी चटक, माळमुनिया, लालमुनिया, काळ्या डोक्याची मनोली, हळद्या, पाणकावळा, धोबी, नदी सुरय आदी दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन कुरनूर धरण क्षेत्रामध्ये होते.

समृद्ध जैवविविधता

  • - हिप्परगा तलाव : युरोप येथील व्हाईट स्टॉर्क (पांढरा करकोचा), मंगोलियातील पट्टकदंब यांच्यासह वूली नेकड स्टॉर्क, पेंटेड स्टॉर्क, कॉमन क्रेन, लिटल कॉरमोरन्टस, ग्रे हेरॉन, पॉन्ड हेरॉन, रिव्हर टर्न्स, ड्रॉन्गो, स्टील्टस असे पक्षी हिप्परगा तलाव परिसरात आढळतात.
  • - बोरामणी : तुळजापूर तालुक्यापासून हा भाग जवळ आहे. या परिसरात लांडगा, हरण, खोकड आदी प्राणी आढळतात. मागील वर्षी याच परिसरात इजिप्शियन वल्चर म्हणजेच पांढºया पाठीचा गिधाड हा दुर्मिळ पक्षी अनेक वर्षांनंतर दिसून आला.
  • - लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने निसर्ग आपल्या पूर्वपदावर येत असल्याचा प्रत्यय येत आहे. सोलापुरात मागील अनेक वर्षांपासून दिसत नसणारी नील गाय ३ मे रोजी कासेगाव (उळे कासेगाव) परिसरात आढळली. 

वातावरणात बदल, वाढते प्रदूषण, औद्योगिकीकरण, वृक्षतोड, तापमानात वाढ, वन्यजीवांचा अधिवास नष्ट होणे, यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नष्ट अथवा दुर्मिळ होत आहेत. त्याचा परिणाम निसर्गचक्रावर होत आहे. निसर्गनिर्मित प्रत्येक प्रजातीचे जतन करणे जरुरीचे आहे.-संतोष धाकपडे, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणwater shortageपाणीकपात