जितेंद्र आव्हाड यांच्या विराेधात भाजपसह अजितदादा गटाची पाेलिसांत तक्रार

By राकेश कदम | Updated: January 4, 2024 19:25 IST2024-01-04T19:24:52+5:302024-01-04T19:25:28+5:30

भावना दुखावल्याचा आराेप : छत्रपती शिवाजी महाराज चाैकात निदर्शने

Ajitdada group along with BJP filed a police complaint against Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांच्या विराेधात भाजपसह अजितदादा गटाची पाेलिसांत तक्रार

जितेंद्र आव्हाड यांच्या विराेधात भाजपसह अजितदादा गटाची पाेलिसांत तक्रार

राकेश कदम

साेलापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा अवमान हाेईल असे वक्तव्य केले आहे. याप्रकरणी आव्हाड यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाेलिस आयुक्तांकडे केली. अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनीही आव्हाड यांच्या विराेधात तक्रार देउन निदर्शने केली. 

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, अनुसूचित जाती माेर्चाचे अशाेक खटके, भाजयुमाेचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाेलिस आयुक्त राजेंद्र माने यांना निवेदन दिले. जाेडभावी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचे काम झाले आहे. वारंवार आव्हाड यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जातात. आव्हाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटाचे युवक शहराध्यक्ष सुहास कदम, तुषार जक्का, दत्तात्रय बडगंची, अरबाज फुलारी, साजिद पटेल, वाजीद पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात जमून निदर्शने केली. फाैजदार चावडी पाेलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली.

Web Title: Ajitdada group along with BJP filed a police complaint against Jitendra Awad