अजिंक्यराणा पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST2021-01-23T04:22:49+5:302021-01-23T04:22:49+5:30

अनगर : राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चार हजार ...

Ajinkyarana Patil felicitated | अजिंक्यराणा पाटील यांचा सत्कार

अजिंक्यराणा पाटील यांचा सत्कार

अनगर : राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चार हजार ७२२ पुस्तकांची भेट त्यांना देण्यात आली.

अनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांकडून ही अनोखी भेट दिली. अनगर येथील शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्यामची आई पुस्तकाचा संच त्यांना भेट देण्यात आला. ही पुस्तके होतकरू, गरीब, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना मोफत देण्याचे अजिंक्यराणा पाटील यांनी जाहीर केले. बाबुराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. अनगरमधील युवकांनीही पाटील यांना चौकाचौकांत केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ग्रामपंचायतीतील नूतन सदस्यांचा सत्कार माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, तावजी पाटील, संकेत ढवळे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीप्रमुख रूपालीताई चाकणकर, यशवंत माने यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. (वा. प्र.)

---

फोटो : २२ अनगर

अनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांना वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देताना मित्रपरिवार.

Web Title: Ajinkyarana Patil felicitated