शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे पवार दाम्पत्य गेले गुजरातला, नडियादमधील कापड कंपनीमध्ये होते नोकरीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:38 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पवार दाम्पत्याचा मृत्यू झाला. गावातील पुतण्या सचिन पवार, सुमन पवार, उषा, कविता, मेहुणे सुनील इंगळे, बाळासाहेब सावंत असे सर्वजण मिळून गुरुवारी रात्री ७:३० वाजता हातीद येथून खासगी वाहनाने नडियादकडे गेले.

- अरुण लिगाडेसांगोला - सांगोल्यात १९७२ साली प्रचंड पडलेल्या दुष्काळात गावी कामधंदा नसल्यामुळे महादेव पवार हे कुटुंबासह गुजरातला गेले होते. नडियाद या ठिकाणी मफतलाल कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पती-पत्नी दररोज नडियादमधील संताराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आणि तेथूनच त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसल्याचे मुलगा रमेश पवार यांनी सांगितले.

अहमदाबाद विमान अपघातात पवार दाम्पत्याचा मृत्यू झाला. गावातील पुतण्या सचिन पवार, सुमन पवार, उषा, कविता, मेहुणे सुनील इंगळे, बाळासाहेब सावंत असे सर्वजण मिळून गुरुवारी रात्री ७:३० वाजता हातीद येथून खासगी वाहनाने नडियादकडे गेले. ते सर्वजण शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास नडियादमध्ये पोहोचले. महादेव पवार यांचा मुलगा रमेश व पुतण्या महेश हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात ठाण मांडून आहेत.

हातीदमध्ये स्वत:चे चार खोल्यांचे घर  मृत महादेव पवार यांचे कुटुंब आजही एकत्र असून, त्यांच्या नावे १६ एकर शेती आहे. हातीद येथेच पत्र्याच्या घरात हे कुटुंबिय राहतात. पण विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांच्या मुळ गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

एका महिन्यापूर्वीच गावाकडे येऊन गेलेनडियादमधील मफतलाल कापड कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर महादेव पवार अधूनमधून गावी हातीद येथे येत असायचे.  २७ एप्रिल २०२५ रोजी उरुसानिमित्त ते पत्नीसह गावी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते आठवडाभर घरीच राहिले होते. त्यानंतर ८ मे रोजी हे दाम्पत्य परत नडियादला निघून गेले. गावाकडचा त्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला.

 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादSolapurसोलापूर