शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शेतीचं सोडा, आम्हाला प्यायलाबी पाणी नाय; केंद्रीय दुष्काळ पथकासमोर शेतकºयांनी मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:55 IST

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात ...

ठळक मुद्दे खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीतजनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात आहेत़ लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत, शेती व्यवसाय धोक्यात आला आहे़ साहेब़़़ शेतीचे सोडा, प्यायलाबी पाणी मिळेनासे झाले आहे, अशी व्यथा शेतकºयांनी केंद्रीय समितीच्या पथकासमोर मांडली.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आंधळगाव येथे पोहोचले. दुष्काळी समिती पथकाच्या अहवालानुसार सरकारी मदत मिळणार म्हणून अनेक शेतकरी सकाळी ७ वाजल्यापासून रस्त्याकडे टक लावून बसले होते़पथकाने आंधळगाव येथे सीताराम वेळापुरे यांच्या खरिपातील जळालेल्या भुईमूग, ज्वारी या पिकांची पाहणी केली़ खरीप जळून गेले, रब्बी पेरणी झाली नाही़ शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय चारा व पाण्याअभावी कोलमडला आहे़ पुढील पावसाळा येईपर्यंत पशुधन जगणे मुश्कील आहे, अशी व्यथा शेतकरी वेळापुरे यांनी पथक प्रमुखाकडे मांडली.

 केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख सुभाषचंद्र मीना, सदस्य एम. जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी सर्व शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, पं स. सभापती प्रदीप खांडेकर, प्रा़ शिवाजीराव काळुंगे, प्रा़ येताळा भगत, झेडपी सदस्या शैला गोडसे, तालुका कृषी अधिकारी नामदेवराव गायकवाड, शिवाजीराव नागणे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते़

पथकप्रमुखांनी प्रश्नोत्तरासह घेतली नोंद- पथकप्रमुख मीना यांनी आंधळगाव येथे पाहणी करताना प्रश्नोत्तरासह मुद्दे नोंदविले़ खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे जनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी आहे. रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली आहे. दरम्यान, शेतकºयांनी मांडलेल्या व्यथा अत्यंत भीषण आहेत़ शासनस्तरावर ही माहिती पोहोचवू शेतकºयांप्रति आपण अत्यंत संवेदनशील आहोत, असे केंद्रीय पथकातील सदस्यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार