शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

लॉकडाऊन काळातील दुपार अन् जुन्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:02 IST

नातीच संपत चाललीत तिथे आठवणींची काय किंमत ?

लॉकडाऊनच्या काळात सकाळ आणि संध्याकाळ कामाच्या ओघात जाते; मात्र दुपार काही केल्या सरत नाही. ती उरावर बसते आणि आपली उलघाल होत राहते. अशावेळी जुन्या काळातली दुपार हटकून आठवत राहते. कारण तेव्हाची ती दुपारची निवांत वेळही तशीच होती, मेंदूचा यंत्रवत ताबा घेणारी तरीही मंत्रमुग्ध करणारी. तेव्हा चिमण्यादेखील चिवचिव करून थकलेल्या असत, परसदारात आई डोईवर पदर घेऊन काहीतरी काम करत असायची. झाडांच्या फांद्या एकमेकींच्या गळ्यात हात घालून सुस्त होऊन गेलेल्या असत. पानगळसुद्धा दुपारी होत नसे. पाने, फुले सगळी कशी आरामात मान वेळावून बसत ! झाडावरल्या घरट्यात देखील सामसूम असे, पाखरांना खाऊ आणायला गेलेले पक्षी अजून घरट्यात परतलेले नसत. त्यांची वाट बघत ती इवलीशी पाखरे आपली चोच उघडी टाकून तशीच पेंगुळलेली असत !

जेवणे आटोपून आपल्या तान्हुल्याबरोबर खेळणाºया आईचा काय तो नाजूक आवाज संगतीला असे, गल्लीच्या एखाद्या कोपºयात सकाळच्या शाळेतून आलेल्या पोरांनी लगोरीचा उनाड डाव मांडलेला असायचा अन् त्याचा मधूनच येणारा आवाजाचा गलका दुपारचा सर्वात मोठा आवाज असे. घरा-घरातल्या पोक्त बायकांनी पदराचा कोपरा ओठात पकडत माजघरातल्या चोरट्या आवाजातल्या गप्पांची बैठक बसवलेली असे. शेजारी कुठेतरी वाळवणातल्या वस्तू वरखाली करायचे काम चालू असे. आसपासच्या एखाद्या घरातून एखाद्या मुलाचा अभ्यास घेतानाचा एकसुरी आवाज येत असे.

रस्त्याच्या वरच्या कोपºयात असलेल्या हापशावर अधूनमधून कोणी पाणी भरायला आले तर त्याचा हापसा मारण्याचा कडाक कडाक आवाज मात्र शांती भंग करत असे. दूर कोठून तरी ऐकू येणारा एखादा वाहनाचा आवाज एवढाच काय तो मोठा व्यत्यय. सगळ्या इमारती आपल्या मुक्या सावल्यात मश्गुल  होऊन गेलेल्या असत. इमारतींच्या आडोशाला, जिन्याखाली भटक्या कुत्र्यांनी मस्तपैकी अंगाचे वेटोळे करून ताणून दिलेली असे. एखाद दुसरा सायकलवाला अवखळ पोरगा ट्रिंग ट्रिंग आवाज करत जायचा त्याचा आवाज देखील मोठा वाटायचा. सगळ्या आसमंतात एक अनामिक शिथिलता आलेली असे, निळ्याशार आकाशातले ढगदेखील एकाच जागी हट्टी मुलासारखे नुसते बसून राहत ! हवाच काय ती शीतल झुळका घेऊन शांत एका लयीत उनाडक्या करत फिरत असे. हवेच्या त्या मंद झुळका खिडकीतून थेट घरभर फेर धरत. हवेच्या झुळका जशा बदलायच्या तशी टवटवीत अवीट गोडीची गाणी एकामागून एक कानावर येत राहत, थोडी खट्टी थोडी मिठी अशी चव असणारी ही गाणी कधी कधी एखाद्या दुपारी उगाच उदास करून जात तेव्हा मात्र दुपार कधी टळून जाते असं वाटायचे ! मात्र  बहुतांशी हा रेडिओवरच्या फर्माईशी गाण्याचा कार्यक्रम त्यातल्या निवेदिकेच्या आवाजाइतका गोष्टीवेल्हाळ अन् मधाळ असायचा. त्यावर माझा इतका जीव जडलेला की आता कधी कधी नुसत्या आठवणींचे आभाळ दाटले की डोळे ओले व्हायला वेळ लागत नाही. 

त्या मंतरलेल्या दुपारच्या काळात नुकतंच जेवण आटोपून वामकुक्षी करणारे बाबा हळूच निद्रादेवीच्या अधीन झालेले बघताना गंमत वाटायची. तेव्हा भर दुपारचा सूर्य देखील फारसा छळत नसे, त्याची किरणे रेडिओवरची गाणी संपत जायची तशी दिशा बदलून घराच्या या कोपºयातून सुरु होऊन त्या कोपºयात विश्रांती घेत. कवडसे आपल्याच नादात उजेडाचा खेळ घरभर झिम्मा खेळत. फार शांत होते ते दिवस अन् फार सुखी होते ते जीवन. कोठलीही रिंगटोन नव्हती की कुठला टीव्ही नव्हता. साधी सोपी पण निखालस हृदयात उतरत जाणारी निखळ करमणूक करणारी ती शांत अशी दुपार नजरेआडून जातच नाही. दिवसभराची शाळा सुटल्यानंतर घरी येणारी मुलेच काय ती संध्याकाळ होत आल्याची खूण असायची. तोपर्यंत रेडिओवरची ती गाणी हातात हात गुंफून सोबतीला राहायची. गारगोटीतून निघणाºया ठिणग्या जशा हळूहळू क्षीण होत जातात तसे या दुपारच्या आठवणींचे झालेय. तशा तप्त ठिणग्याची आता ओढ नाही पण त्या गारगोट्या तशाच अजून दिवाणखाण्यातल्या कपाटात मखमली कापडात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या सुरेख आठवणी अनेक असतील पण निवांत अन् अस्ताव्यस्त पहुडलेल्या अंगावर मायेची रजई घेऊन आपल्याला गुरफटून टाकणाºया त्या दुपारच्या आठवणींनी नकळत डोळे ओले होतात.

आताच्या या कृत्रिम जगात सारीच दिनचर्या बेगडी झालीय, काय जगतोय आणि का जगतोय याचाच शोध घेत स्वत:ला अजूनही शोधतो आहे. एकेकाळी मामा, मामी, काका, काकी, आत्या, आजोबा, आजी,  मावशी, दादा, ताई ही नाती सर्वांच्या वाट्याला असत. काही ठिकाणी आता यातील ताई आणि दादाच राहिलेत तेही नावापुरते. नातीच संपत चाललीत तिथे आठवणींची काय किंमत ? रसाळ आठवणींचा हा झरा अनेकांच्या जगण्याचे स्फूर्तीस्रोत बनून गेला असेल तर त्यात नवल ते काय !- समीर गायकवाड,(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस