शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूर जिल्ह्यात आठ टँकर अन् पाच छावण्या तातडीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 20:52 IST

निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती : दोन दिवसात केली उपाययोजना

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता.मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. या उपक्रमात तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते. 

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, पाणीच मिळत नसल्याची तक्रार यावेळी काही महिला सरपंचांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गावात तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी संबंधित विभागास मागणी आलेल्या ठिकाणी तातडीने प्रस्ताव सादर करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार टंचाई असणाºया गावात ६ खासगी बोअरवेलही ताब्यात घेण्यात आले आहेत. या माध्यमातूनही टंचाई गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांकडून आलेल्या मागणीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

सोमवारपर्यंत मागणी आलेल्या गावांची पाहणी करण्यात आली. मंगळवारी मागणी आलेल्या सर्व ठिकाणी टँकर, छावण्या देण्याची व्यवस्था करण्यात आली. 

पीकविमा योजनेचा अहवाल अप्राप्तच्पीकविमा योजनेत शेतकºयांना मदत देताना दुजाभाव करण्यात आला असल्याची तक्रार एका सरपंचाने मुख्यमंत्री यांच्याकडे संवादादरम्यान केली होती. काही शेतकºयांना तीन हजार तर काही शेतकºयांना त्याच पिकासाठी तिवढ्याच क्षेत्रासाठी तीस हजारांपर्यंत मदत देण्यात आल्याची बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते, मात्र हा अहवाल आपल्याकडे आला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय